गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !   

परब्रह्मतत्त्वाची दिव्य अनुभूती देणार्‍या त्रिदेवस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः नमन !

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।

– गुरुगीता, श्लोक ३२

अर्थ : गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. गुरुच परब्रह्म (ईश्वराचा ईश्वर) आहेत. अशा श्री गुरूंना मी नमस्कार करतो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

भावार्थ : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये सर्व देवतांची तत्त्वे सामावली आहेत’, अशी अनुभूती सनातनचे साधक नेहमी घेतात. ज्ञानस्वरूप ब्रह्मदेव, वात्सल्यस्वरूप श्रीविष्णु अन् वैराग्यस्वरूप महेश्वर, या तिघांमधील अंशरूपी तत्त्व घेऊन प्रगटलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव साधकांसाठी त्रिदेवस्वरूप आहेत. साक्षात् परब्रह्मतत्त्वाची दिव्य अनुभूती देणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः नमन !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१२.५.२०२३)