सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
सर्वांभूती वास करणारे आणि साधकाला आत्मतत्त्वाच्या अनुभूतीप्रत नेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘मन्नाथः श्रीजगन्नाथो मद्गुरुस्त्रिजगद्गुरुः ।
ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः ।।
– गुरुगीता, श्लोक ७५
अर्थ : माझे गुरुनाथ सर्व जगाचे नाथ, म्हणजे स्वामी आहेत. माझे गुरु तिन्ही जगाचे गुरु आहेत. ‘माझा आत्मा सर्वव्यापी, म्हणजेच सर्वांभूती असणारा आत्मा आहे’, अशा अनुभवाप्रत नेणार्या श्री गुरूंना नमस्कार असो.’
भावार्थ : ‘श्री गुरूंच्या कृपेचा प्रभाव तिन्ही लोकांत पडतो. श्री गुरुच सर्व जगताचे नाथ आहेत. तेच सर्व साधकांचेही नाथ आहेत. अशा जगन्नाथस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी नतमस्तक होऊया. सर्वांभूती वास करत असलेल्या श्री गुरूंचे दिव्य अस्तित्व आपल्या अंतरी अनुभवत अंतःस्थित श्री गुरुतत्त्वाला कोटीशः नमन करूया !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (८.५.२०२३)