दुर्ग (छत्तीसगड) – पोलिसांनी ६० लाखांहून अधिक रुपयांच्या चोरी प्रकरणी २ बांगलादेशी घुसखोरांना नुकतीच अटक केली. भारत-बांगलादेश सीमेवरील तार कापून भारतात प्रवेश केल्याचे आरोपींनी सांगितले. (सीमेवरील तार कापून बांगलादेशींनी भारतात प्रवेश मिळवणे, हे सीमा सुरक्षादलाला लज्जास्पद ! – संपादक) ‘यानंतर १ सहस्र ५०० रुपयांमध्ये आधार कार्ड बनवून देशाच्या विविध भागांत जाऊन आमही चोरी करत होतो’, अशी स्वीकृती या आरोपींनी दिली. (यावरून बंगालमध्ये भ्रष्टाचार किती फोफावला आहे, हे लक्षात येते ! – संपादक)
छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात गेल्या ६ एप्रिलला चोरी झाली होती. या प्रकरणाचे अन्वेषण करतांना पोलिसांनी दोन्ही आरोपींना बंगालमधून अटक केली. महंमद हसमत खलिफा आणि अलताफ हुसेन अशी या आरोपींची नावे आहेत. पोलीस अन्वेषणात आरोपी महंमद हसमत खलिफा याने चार मासांपूर्वी भारतात घुसखोरी केल्याचा खुलासा केला. सीमेवरून घुसखोरी करण्यासाठी दलालाला ५ सहस्र रुपये द्यावे लागतात, असेही त्याने पोलिसांनी सांगितले. यानंतर दलाल सीमा कापतात आणि त्याखालून ते भारतात प्रवेश करतात, असे हसमत याने सांगितले. (मग सीमांचे रक्षण करणारे सीमा सुरक्षादलाचे सैनिक झोपा काढत असतात का ! – संपादक)