
मुंबई, ७ मे (वार्ता.) – देशभरात ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’चे भीषण वास्तव जगापुढे येत असतांना लव्ह जिहादने महाराष्ट्रालाही विळखा घातल्याचे समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून मागील मासात ६ हिंदु युवती मुसलमान युवकांसमवेत पळून गेल्या आहेत. पळून गेलेल्या मुलींच्या पालकांकडून पोलीस ठाण्यात तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या असून पोलिसांकडून त्यांचा शोध चालू आहे. पळून गेलेल्या हिंदु युवती सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.
1 महीने में 5 लड़कियां गायब, घरों के बाहर ‘I love u जान’ का पोस्टर भी लगाया https://t.co/mHiO22GrWl
— Hindu Samvaad (@HinduSamvaad) May 6, 2023
१. यांतील एक युवती बंगाल, एक युवती मथुरा आणि एक झारखंड येथून आलेल्या कुटुंबातील आहे, तर उर्वरित ३ युवती स्थानिक सिंधी कुटुंबातील आहेत. यांतील एक युवती मुसलमान युवकासमवेत बिहार येथे पळून गेल्याचे पोलीस अन्वेषणात आढळून आले आहे.
२. अन्य धर्मियांसमवेत पळून जात असलेल्या हिंदु युवतींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. (‘लव्ह जिहाद फोफावण्याला पोलीसच उत्तरदायी आहेत’, असे म्हटले तर गैर काय ? – संपादक) यामुळे २ दिवसांपूर्वी सकल हिंदु समाजाच्या वतीने काही हिंदुत्वनिष्ठांनी येथील सेंट्रल पोलीस ठाण्यात जाऊन या नियोजित षड्यंत्राची चौकशी करून हिंदु युवतींचा तात्काळ शोध घेण्याचे आवाहन केले आहे.
३. पळून गेलेल्या हिंदु युवती घरी न आल्यास आंदोलन करण्याची चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून देण्यात आली आहे.
४. मागील काही वर्षांपासून उल्हासनगर येथे सातत्याने ख्रिस्ती मिशनरी आमिषे दाखवून स्थानिक सिंधी युवतींचे धर्मांतर करत आहेत. अशा प्रकारे मागील काही वर्षांत उल्हासनगर येथील सहस्रावधी हिंदु युवतींना ख्रिस्ती धर्मांतरीत करण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या प्रकारांमुळे येथील स्थानिक हिंदूंची ससेहोलपट होत आहे. (हिंदु युवतींनो, धर्मांतरित होऊन स्वतःची ससेहोलपट करून घेण्यापेक्षा हिंदु धर्माचाच अवलंब करा ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदु युवतींना धर्मशिक्षण नसल्यामुळेच त्या लव्ह जिहादला बळी पडून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत ! |
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
(म्हणे) ‘मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास भारतावर टीका करण्यास मागेपुढे पहाणार नाही !’ – US Lawmakers