गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !       

साधकांना साधनेचे दिव्य ज्ञान प्रदान करून त्यांची संचित कर्मे जाळून भस्म करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘अनेकजन्मसम्प्राप्तसर्वकर्मविदाहिने ।

स्वात्मज्ञानप्रभावेण तस्मै श्रीगुरवे नमः ।। – गुरुगीता, श्लोक ७३

अर्थ : आपल्या आत्मज्ञानाच्या प्रभावाने जन्मोजन्मी साठवलेली (साधकांची) सर्व संचित कर्मे जाळून भस्म करणार्‍या श्री गुरूंना नमस्कार असो.’

भावार्थ : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधकांच्या जीवनात झालेले दिव्य तेजोमय आगमन आणि त्यांनी साधकांना दिलेले साधनारूपी गूढ रहस्यात्मक आत्मज्ञान, यांमुळे साधकांच्या जन्मोजन्मीच्या संचित कर्मांच्या राशीच्या राशी जळून भस्म होत आहेत. अशा दिव्य तेजोमय आणि ज्ञानमय अशा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्य चरणी कोटीशः नमन !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (६.५.२०२३)