भारतभरात पुजारी नेणारे महाराष्‍ट्रातील राजे !

दक्षिणेकडील मंदिरे ज्‍यामध्‍ये रामेश्‍वरम् येथे सर्वांत महत्त्वाचा विधी करणारे पुजारी हे रानडे आहेत. उत्तर भारतातील उज्‍जैन येथील महाकाल ज्‍योतिर्लिंगाचे पुजारी कराडकर, तर प्रयागराज येथील श्राद्धादी धार्मिक विधी करणारे पुजारी आहेत पित्रे ! दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मण पुजार्‍यांना नेले, तर उत्तरेत पेशव्‍यांनी ! ब्राह्मण पुजार्‍यांमध्‍ये कोकणस्‍थ असेल, तर त्‍यांना विशेष मान आहे, जसे काशी येथील पुजार्‍यांना असतो. छत्रपतींनी आणि पेशव्‍यांनी मोगलांनी कह्यात घेतलेली, आक्रमण केलेली अनेक मंदिरे केवळ सोडवली नाही, तेथे केवळ सोने-नाणेच दिले नाही, तर मंदिरातील धार्मिक विधी, पूजापाठ करण्‍यासाठी पुजार्‍यांनाही तेथे नेले. यातून मंदिर रक्षणाची किती विलक्षण दूरदृष्‍टी त्‍यांच्‍यात दिसून येते.

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.