१. श्री. दीपक लढ्ढा, सोजत रोड (जिल्हा पाली), राजस्थान
अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या निमित्त भावसोहळा पहातांना ‘संपूर्ण पृथ्वी रामनाथी आश्रम आहे. मी स्थुलातून कुठेही असलो, तरी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणांजवळच आहे’, असे मला जाणवले. माझा भाव जागृत झाला. माझा गुरुदेवांप्रती विश्वास दृढ झाला.
आ. ‘आता हिंदु राष्ट्र (ईश्वरी राज्य) समीप आले आहे’, असे मला वाटले.
इ. ‘माझ्या हृदयात हा जन्मोत्सव साजरा केला जात आहे’, असे मला जाणवले.
ई. ‘परात्पर गुरु डॉक्टर जन्मोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला अष्टांग योगाची साधना शिकवण्यासाठी आले आहेत’, असे वाटून माझी कृतज्ञता व्यक्त झाली.’
२. सौ. शुभ्रा भार्गव, जयपूर
अ. साधकांनी ‘आम्हाला गुरुदेवांचा सत्संग लाभला’, असे सांगितल्यावर मला वाईट वाटत असे; कारण मी यापूर्वी गुरुदेवांना पाहिले नव्हते. तेव्हा मी माझ्या मनाला ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे आणि मी गुरुदेवांना सूक्ष्मातून कधीही अनुभवू शकते’, असे समजावत असे. माझ्या मनात ‘गुरुदेवांच्या कार्याशी एकरूप होणे, म्हणजे त्यांना भेटल्यासारखेच आहे’, असा विचार दृढ झाला.
आ. मला वाटले, ‘मी स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केले नाही, तर माझे जीवन पशूप्रमाणे असेल.’ ‘मला उत्तम शिष्य बनायचे आहे’, या विचाराने स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी मी सारणी लिखाण करायला लागले अन् स्वयंसूचना सत्र करायला लागले.
इ. मी आता ‘कुटुंबियांकडून कसलीही अपेक्षा करणार नाही’, असे प्रयत्न चालू केले आहेत.
|