हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्‍ट्राचे कार्य चांगले आणि प्रशंसनीय ! – स्‍वस्‍तिक पीठाधिश्‍वर डॉ. अवधेशपुरी महाराज

  • हिंदु जनजागृती समितीचे सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली स्‍वस्‍तिक पीठाधिश्‍वर डॉ. अवधेशपुरी महाराज यांची सदिच्‍छा भेट !

  • हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्‍ट्र संपर्क अभियान’

स्‍वस्‍तिक पीठाधिश्‍वर डॉ. अवधेशपुरी महाराज यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट देतांना सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (डावीकडे)

उज्‍जैन (मध्‍यप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीचे मध्‍यप्रदेश राज्‍यात ‘हिंदु राष्‍ट्र संपर्क अभियान’ चालू आहे. या अंतर्गत समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी स्‍वस्‍तिक पीठाधिश्‍वर डॉ. अवधेशपुरी महाराज यांची भेट घेतली आणि त्‍यांना धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी चालू असलेल्‍या प्रयत्नांविषयी माहिती सांगितली. या वेळी त्‍यांना जून मासात गोवा येथे होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे निमंत्रण देण्‍यात आले. यानिमित्त डॉ. अवधेशपुरी महाराज म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही सर्व संघटनांना समवेत घेऊन मोठ्या उदारतेने कार्य करत आहात. हे पाहून अतिशय चांगले वाटले. समितीचे हिंदु राष्‍ट्राचे कार्य प्रशंसनीय आहे.’’ या वेळी डॉ. अवधेशपुरी महाराज यांना ‘हलाल प्रमाणपत्र’ या देशविरोधी षड्‍यंत्राची माहिती देणार्‍या ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देण्‍यात आला.

भाजपचे उज्‍जैन शहराध्‍यक्ष श्री. विवेक जोशी यांच्‍याशी भेट

उज्‍जैन (मध्‍यप्रदेश) – भाजपचे उज्‍जैन शहराध्‍यक्ष श्री. विवेक जोशी यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची भेट घेतली.  या वेळी सद़्‍गुरु डॉ. पिंगळे यांनी त्‍यांना समितीच्‍या वतीने धार्मिक शिक्षण देण्‍यासाठी चालू असलेल्‍या उपक्रमाची, तसेच हलाल प्रमाणपत्राच्‍या माध्‍यमातून देशावर चालू असलेल्‍या संकटाविषयी माहिती सांगितली. या प्रसंगी सद़्‍गुरु डॉ. पिंगळे यांनी श्री. विवेक जोशी यांना ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिला. या वेळी श्री. विवेक जोशी यांनी ‘समितीच्‍या धर्मशिक्षणाच्‍या कार्याला आवश्‍यक ते सहकार्य करीन’, असे सांगितले.