बिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेजप्रताप यादव यांची पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना चेतावणी
पाटलीपुत्र (बिहार) – बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे १३ मे या दिवशी पाटलीपुत्र येथे येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि राज्याचे वन अन् पर्यावरण मंत्री तेजप्रताप यादव यांनी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना चेतावणी दिली आहे. यादव यांनी म्हटले आहे की, जर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पाटलीपुत्र येथे हिंदु आणि मुसलमान यांच्यात भांडणे लावणार असतील, तर मी त्यांचा विरोध करीन. विमानतळावर त्यांना घेराव घालण्यात येईल. ते बंधूभावाचा संदेश देत असतील, तर त्यांना बिहारमध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो. (बंधूभाव केवळ हिंदूंनी दाखवायचा आणि मुसलमानांचे नेते, धर्मगुरु यांनी विद्वेष पसरवायचा, असे तेजप्रताप यादव यांना अपेक्षित असेल, तर तसे होणार नाही, हे हिंदूंनी त्यांना वैध मार्गाने सांगणे आवश्यक आहे ! – संपादक)
बागेश्वर धाम के धीरेंद्र शास्त्री पर Tej Pratap Yadav का बयान- भाईचारे की बात करेंगे तो स्वागत, वर्ना…#DhirendraShastri #TejPratapYadav #Bihar #BageshwarDhamhttps://t.co/PoWy3Hg4OI
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) April 27, 2023
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत आहेत, मंदिरांची तोडफोड करत आहेत, तेव्हा तेजप्रताप यादव तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |