दोन मंदिरांतील देवीच्या मूर्तींवर लघवी करणार्‍याला मोइउद्दीनला अटक !

  • मुझफ्फरपूर (बिहार) येथील संतापजनक घटना !

  • हिंदूंनी केलेल्या तीव्र विरोधानंतर पोलिसांनी केली कारवाई !

मुझफ्फरपूर (बिहार) – येथे महंमद मोइउद्दीन नावाच्या धर्मांध मुसलमान युवकाने २ मंदिरांमध्ये जाऊन तेथील देवीच्या प्रतिमांवर लघवी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या वेळी तो मुसलमान धर्मानुसार घोषणा देत होता. यावरून आक्रोशित झालेल्या हिंदूंनी मोइउद्दीनला चोपले, परंतु गर्दीचा लाभ घेऊन तो घटनास्थळावरून फरार झाला. हिंदूंनी याविरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी मोइउद्दीनला त्याच्या घरातून अटक केली. (हिंदूंनी आवाज उठवला नसता, तर पोलीसही हातावर हात धरून बसले असते, असा अर्थ यातून काढायचा का ? – संपादक) उपचारांसाठी त्याला रुग्णालयात पाठवून देण्यात आले आहे. (अशा घटनांमध्ये मुसलमान आरोपीला मानसिक आजार असल्याचे सांगून घटनेचे गांभीर्य शून्य केले जाते. मानसिक आजाराने ग्रस्त मुसलमान कधी असे कृत्य मशिदीत केल्याचे ऐकिवात आहे का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य भ्रष्ट करणार्‍या धर्मांधावर कारवाई होण्यासाठी हिंदूंना तीव्र विरोध करायला लावणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशांवर कठोर कारवाई करा !
  • जर हिंदूने एखाद्या मशिदीत जाऊन असे कृत्य केले असते, तर एव्हाना संपूर्ण देश पेटला असता, इस्लामी देशांनी मोदी शासनाला धारेवर धरले असते आणि संबंधित हिंदूचे ‘सर तन से जुदा’ही होऊ शकले असते, हे लक्षात घ्या !