रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

श्री. रवि. स. परब, शिरवळ, सातारा.

अ. ‘रामनाथी आश्रमाला भेट देणे’, हा एक दैवी संकेत आहे. ‘सकल हिंदु राष्‍ट्राच्‍या निर्मितीचे उद़्‍गाते सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी उभारलेल्‍या या संकल्‍प मंदिराला भेट द्यायला मिळणे’, हीच गुरुमाऊलींची अपार कृपा आहे.

आ. रामनाथी आश्रमाचा परिसर अतिशय सुंदर आहे. मला येथील वास्‍तूमध्‍ये ईश्‍वरी अंश असल्‍याची प्रचीती पावलोपावली येत होती.

इ. ‘या मंदिराची (आश्रमाची) प्रसिद्धी दूरवर होऊन हिंदु राष्‍ट्राची निर्मिती व्‍हावी’, हीच सद़्‍गुरुचरणी प्रार्थना करतो. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

सूक्ष्म जगताविषयी दिलेले अभिप्राय

‘सूक्ष्म जगतासंबंधीचे प्रदर्शन, म्‍हणजे परात्‍पर गुरुमाऊलींचा परीसस्‍पर्श आहे. ‘या सूक्ष्म जगातही गुरुमाऊलींचे आमच्‍यावर छायाछत्र आहे’, याची मला प्रचीती आली.’

(८.५.२०२२)

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक