उत्तराखंडमध्ये अवैध मजारींवर होणार कारवाई ! – मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

  • राज्याला ‘लँड जिहाद’पासून मुक्त करण्याचा संकल्प

  • राज्यात १ सहस्रांहून अधिक मजारी असल्याची माहिती

डेहराडून (उत्तराखंड) – राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्याला ‘लँड जिहाद’पासून पूर्णपणे मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. (लँड जिहादच्या विरोधात धडक कृती करण्याचा निर्णय घेणारे धामी यांचे अभिनंदन ! – संपादक) राज्यात साधारण १ सहस्रांहून  अधिक अवैध मजारी आहेत.(मजार म्हणजे मुसलमानाचे थडगे) त्यांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री धामी यांनी अलीकडेच हृषिकेश दौरा केला. त्या वेळी १६ एप्रिल २०२३ या दिवशी ऋषिकेश दौर्‍यावर होते. या वेळी त्यांनी परमार्थ निकेतन येथे गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमानंतर धामी यांनी उपस्थित लोकांना संबोधित केले. मुख्यमंत्री धामी म्हणाले, ‘‘पवित्र गंगानदीच्या तिरावर अनेक ठिकाणी अवैध मजारी बांधण्यात आल्या आहेत. ही अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सरकारने चालू केली आहे.’’

धामी सरकारने डिसेंबर २०२२ आणि मार्च २०२३ मध्ये कारवाई करत ४१ अवैध मजारी पाडल्या होत्या. आता १ सहस्र अवैध मजारींची सूची करून सरकार पुन्हा एकदा त्यांच्यावर कारवाई चालू करणार आहे.

संपादकीय भूमिका

एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मजारी उभ्या राहिल्या जात असतांना प्रशासन झोपले होते का ? उत्तराखंड ‘लँड जिहाद’मुक्त करण्यासह अशी अवैध बांधकामे होऊ देणार्‍यांवर धामी यांनी कारवाई करावी !