दैनिक ‘सनातन प्रभात’चे हिंदुहिताच्या कार्यातील योगदान !

श्री. अजय केळकर
  • गोरक्षकांच्या संदर्भात राज्यस्तरीय कार्य करणार्‍या गोरक्षकांचा एक ‘व्हॉट्सॲप’चा गट आहे. त्यात मी नेहमी ‘सनातन प्रभात’मधील गोवंशियांच्या संदर्भातील वृत्त पाठवतो. या संदर्भात गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्थेचे श्री. अंकुश गोडसे म्हणाले, ‘‘गायींच्या संदर्भात देशातील कानाकोपर्‍यात कुठेही होणार्‍या घटना ‘सनातन प्रभात’मध्ये वाचावयास मिळतात, तसेच या माध्यमातून गोरक्षणाचे कार्य केवळ राज्यात नाही, तर देशात कुठे-कुठे चालू आहे, हेही कळण्यास साहाय्य होते.’’
  • कोल्हापूर शहरात मध्यंतरी एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेने आंदोलन आयोजित केले होते. त्या आंदोलनासाठी अन्य कुठल्याही दैनिक अथवा वृत्तवाहिनीचा पत्रकार उपस्थित नव्हता. त्या वेळी संबंधित संघटनेचे एका पदाधिकारी म्हणाले, ‘‘अन्य कुठल्याही दैनिकाचे प्रतिनिधी आले नाही, तरी दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी येणार, याची मला निश्चिती होती. हे वृत्त अन्य कुणी जरी दिले नाही, तरी ते दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये येणार याची मला निश्चिती आहे.’’ यावरून समाजात हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्येही दैनिकाप्रती असलेली विश्वासार्हता लक्षात येते.
  • कोल्हापूर येथील ‘विजेता तरुण मंडळा’चे अध्यक्ष श्री. पंकज पोवार म्हणाले,‘‘गड-दुर्गांच्या संदर्भात इतक्या आत्मियतेने आजपर्यंत कुणीही माहिती घेतली नव्हती. तसेच गडांविषयी सविस्तर माहिती दिल्याने आमचे कार्य अनेकांपर्यंत पोचवण्यास साहाय्य झाले.’’
  • कार्तिक वारीच्या काळात ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून वारकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याविषयी अनेक वारकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. ‘आमचे प्रश्न प्रशासकीय पातळीवर मांडण्यासाठी आमचे हे हक्काचे व्यासपीठ आहे, असे आम्हाला वाटते, असे ह.भ.प. अनंत सातपुते यांनी सांगितले.

– श्री. अजय केळकर, वार्ताहर, दैनिक ‘सनातन प्रभात’, कोल्हापूर.