पुणे – गोरक्षा दल, महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांनी ५ एप्रिल या दिवशी नगर जिल्ह्यातील पारनेर, जुन्नर येथील आळेफाटा, पुणे येथील हडपसर आणि मुंढवा अशा ४ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी कारवाई करून १३० जनावरांचे प्राण वाचवले. चारही ठिकाणी केलेल्या कारवाईमधील साम्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी जनावरांना कत्तलीसाठी नेणारे धर्मांधच आहेत.
४ वेगवेगळ्या ठिकाणी केलेली कारवाई
१. नगर जिल्ह्यातील पारनेर येथे केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी जात असलेल्या एकूण ९४ जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत जाहेब कुरेशी, रेहान कुरेशी, महंमद नशीर कुरेशी, महंमद आसिफ कुरेशी, सादिकीन कुरेशी, महंमद शेख, महंमद लालू शेख, ताहीर मलिक, फयाज अकीज, सलमान मलिक, जावेद शेख, महंमद अमर कुरेशी अशा एकूण १२ जणांना पोलिसांच्या कह्यात दिले आहे. या प्रकरणी गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन यांनी तक्रार दिली आहे. या कारवाईत नगर मधील स्थानिक धर्माभिमानी हिंदु तरुण, गोरक्षक आबा नायकवडी, निर्भय नारी धनश्री ताई म्हस्के आणि पंडित दादा मोडक यांचे विशेष सहकार्य लाभले.
२. जुन्नर येथील आळेफाटा येथे केलेल्या कारवाईत एकूण २४ जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी इसरार कुरेशी आणि सलाम शेख यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत जुन्नर येथील स्थानिक धर्माभिमानी हिंदु, हिंदुत्वनिष्ठ रवींद्र पडवळ आणि पोलीस यांचे विशेष सहकार्य लाभले.
३. मुंढवा येथे केलेल्या कारवाईत एकूण ११ जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी गाडीचालक सोहेल कुरेशी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
४. हडपसर येथे केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी जात असलेल्या एका वयस्कर देशी गायीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी गाडीचालक सोहेल कुरेशी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
(गोवंशीय किंवा त्यांचे मांस यांची अवैध ने-आण झाली नाही, असा एकही दिवस केवळ भारतातच जात नाही. पोलिसांकडून प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यांचे योग्य अन्वेषण, तसेच कडक कारवाई होत नसल्याने गोवंशियांची हत्या वाढत आहे. केवळ गुन्हा नोंद करून न थांबता गोतस्करांवर कडक कारवाई करावी ! गोवंश हत्या रोखण्यासाठी गोरक्षक जसे प्राणपणाने प्रयत्न करतात, तसे प्रयत्न पोलिसांनी केल्यास गोवंश हत्या रोखण्यासाठी साहाय्य होईल. – संपादक)