परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावसत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १४ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

कु. सायली देशपांडे

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील सामर्थ्याची आलेली प्रचीती

‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावसत्संगाच्या वेळी ते एका पांढर्‍या रंगाच्या डब्यातील पाण्यात एकेक बोट बुडवत असतांना डबा अपारदर्शक असूनही पाण्याच्या रंगातील पालट बाहेरून दिसत होता. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांमधील सामर्थ्याची प्रचीती आली.

२. भावसत्संगाच्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांकडे पाहिले. तेव्हा मला त्यांच्यावर गुलाबी रंगाची छटा आल्याचे जाणवले.

(‘गुलाबी रंग प्रीतीदर्शक आहे आणि प्रीती हा परात्पर गुरु डॉक्टरांचा स्थायीभाव आहे.’ – संकलक)  

३. भावसत्संगाच्या वेळी ‘स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होत आहे’, असे जाणवणे

‘माझ्यावर पुष्कळ त्रासदायक (काळ्या) आवरण आले आहे’, असे मला जाणवत होते. त्यामुळे माझी पुष्कळ चिडचिड होत होती. परात्पर गुरु डॉक्टरांच्या झालेल्या भावसत्संगात ‘माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवले.

४. साधक बोलत असतांना अत्तर आणि धूप यांचा सुगंध येणे

भावसत्संगाच्या वेळी कु. श्रीनिवास देशपांडे (आताची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ११ वर्षे) बोलत असतांना परात्पर गुरुदेवांनी सर्वांना विचारले, ‘‘कोणता सुगंध येतो ?’’ त्या वेळी मला अत्तराचा सुगंध आला. यानंतर अन्य एक साधक बोलत असतांना मला धुपाचा सुगंध आला.

५. भावसत्संग संपल्यानंतर मला हलकेपणा जाणवून आनंद वाटू लागला.

६. भावसत्संगानंतर हलकेपणा जाणवणे

या भावसत्संगाच्या वेळी ‘मला पुष्कळ जांभया येऊन माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवले. नंतर मला शांत वाटले आणि हलकेपणा जाणवला.’

– कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक