शरणागत जिवाचे हृदय हेच भगवंताचे विश्रांतीस्‍थान

‘शरणागत जिवाचे हृदय हेच भगवंताचे विश्रांतीस्‍थान ! ‘अन्‍यथा देवाला घरच नसते’, असे वाक्‍य मी वाचले होते. जिथे शुद्धता, पवित्रता आणि निर्मळता असते, तिथेच भगवंत रहातो. हे केवळ भावामुळेच आपल्‍याला साध्‍य होऊ शकते. ‘याच्‍या संदर्भात देवच आपल्‍याला विचार सुचवतो’, असे मला मनाच्‍या स्‍तरावर अनुभवता येत होते. त्‍या वेळी मला पुढील ओळी सुचल्‍या.

सौ. स्वाती शिंदे

शुद्ध मनाच्‍या भावनगरी ।
देवच फेरफटका मारी ॥ १ ॥

त्‍याच्‍या अस्‍तित्‍वाने कारंजे आनंदाचे थुईथुई नाचे ।
देवाच्‍या चरणी दास्‍यत्‍वाचे कोमल गालिचे ॥ २ ॥

ताटवे फुलले विविध गुणांचे ।
अनुभव येती क्षणोक्षणी ॥ ३ ॥

भगवंताच्‍या भक्‍तवत्‍सलतेचे ।
भावाश्रूरूपी दवबिंदू शोभविती चरण श्री गुरूंचे ॥ ४ ॥

– सौ. स्‍वाती संदीप शिंदे (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक