
नवी देहली – वर्ष २०१९ मध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठासमोर झालेल्या हिंसेच्या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवत ११ पैकी ९ आरोपींवर आरोपनिश्चिती केली आहे. ‘व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, जमावाच्या पहिल्या ओळीतील लोक देहली पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत, तसेच तेथे असलेले ‘बॅरिकेड’ ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
जामिया हिंसा केस: शरजील और सफूरा समेत 9 आरोपियों को दिल्ली हाईकोर्ट से झटका, रद्द किया बरी होने का आदेश #delhi #jamiamilliaislamiauniversity #delhihighcourt https://t.co/YigXJlgPyp
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) March 28, 2023
यामुळे आता शरजील इमाम, सफूरा जरगर आणि आसिफ इकबाल यांच्यासमवेत ९ जणांना आरोपी म्हणून निश्चित करण्यात आले आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी निर्णय देतांना म्हटले की, शांततापूर्वक लोकांना एकत्र करण्याच्या अधिकारांतर्गत हिंसा करणे अथवा हिंसा भडकावण्याची भाषणे देणे अंतर्भूत नाही !
काय आहे प्रकरण ?
वर्ष २०१९ मध्ये नागरिकत्व संशोधन विधेयक आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या कायद्यांच्या विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाच्या बाहेर काही धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केला होता अन् विद्यापिठाच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी १२ जणांना अटक करण्यात आली होती.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !