सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
सकाळी देवपूजेसाठी फुले काढतांना ‘मला फुले काव्य सांगत आहेत, तसेच ती गुरुचरणी जाण्यास आतुरली आहेत’, असे मला वाटते. गुरुदेवांच्या कृपेने सुचलेली कविता गुरुचरणी अर्पण करतो.
आता गुरुचरणी जाऊया ।
आता गुरुचरणी जाऊया ।। १ ।।
सर्वस्व गुरुचरणी अर्पूनी ।
स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनी ।। २ ।।
गुरु आज्ञापालन करूया ।
आता गुरुचरणी जाऊया ।। ३ ।।
मनातील आसक्तीचे द्वंद्व ।
गुरुचरणी अर्पण करूनी ।। ४ ।।
सदैव वर्तमानस्थितीत राहूया ।
अन् गुणसंवर्धन करूया ।। ५ ।।
ईश्वरप्राप्तीचे ध्येय निश्चित करूया ।
आता गुरुचरणी जाऊया ।। ६ ।।
अनुभवूनी वरदान गुरुदेवांचे ।
सनातनरूपे सर्वत्र आहे सदा ।। ७ ।।
देहरूपी पणती गुरुचरणी अर्पण करूनी ।
व्यष्टी अन् समष्टी साधनारूपी तेल नित्य घालूनी ।। ८ ।।
हिंदु राष्ट्राचे साक्षीदार नाही ।
तर भागीदार होऊया ।। ९ ।।
आता गुरुचरणी जाऊया
आता गुरुचरणी जाऊया ।। १० ।।
– श्री. युवराज नारायण गावकर (वय ३६ वर्षे), डिचोली, गोवा. (१५.२.२०२३)
|