श्रीरामरक्षास्तोत्रात एक श्लोक आहे, चरितम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । (अर्थ : रघुनाथ (रघुकुलात श्रेष्ठ, रघुकुलाचा स्वामी) रामाच्या चरित्राचा विस्तार शंभर कोटी श्लोकांएवढा आहे.) त्याचप्रमाणे साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याबद्दल लिहिल्यास अनेक ग्रंथ होतील.
वर्ष १९९५ मध्ये मी एक दिवस मुंबईमधील सेवाकेंद्रात सेवेसाठी गेलो होतो. तिथे मी साधकांनी दिलेला प्रसाद सेवन केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला एका ग्रंथातून काही शोधायला सांगितले. ती सेवा करून काही वेळाने मी घरी जायला निघालो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला विचारले, तुम्ही जे शोधत होता, ते तुम्हाला मिळाले का ? तेव्हा मी हो म्हणून निघालो.
वास्तविक पहाता मी त्यांच्या भेटीसाठी आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्याच संदर्भात त्यांनी मला प्रश्न विचारला होता, हे माझ्या लक्षात आले. माझ्या मनातील त्यांनी जाणले, याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटले.
– श्री. व्यंकटेश बेलापुरकर, कुर्ला, मुंबई.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |