सांगली, २२ मार्च (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाच्या स्मरणार्थ बलीदानमासाच्या अखेरीस म्हणजे २१ मार्चला प्रतिकात्मक अंत्ययात्रा (मूकपदयात्रा) काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात आला. या चितेसाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढुबुद्रुक येथील समाधीपासून ज्वाला आणण्यात आली होती. सांगली शहरात मारुति चौक येथून प्रारंभ होऊन शहरातील विविध मार्गांवरून जाऊन मारुति चौक येथे यात्रेचा समारोप झाला. याचप्रकारे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे, तसेच कोल्हापूर शहरासह अनेक ठिकाणी मूकपदयात्रा ढण्यात आली.