श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास कराड (सातारा) येथे श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने ‘मूक पदयात्रा’ !

कराड, २२ मार्च (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्‍या बलीदानमासाच्‍या निमित्त ‘फाल्‍गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्‍गुन अमावास्‍या’ या कालावधीत ‘धर्मवीर बलीदानमास’ म्‍हणून पाळण्‍यात येतो. फाल्‍गुन अमावास्‍या या दिवशी महाराजांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त त्‍यांच्‍या न निघालेल्‍या अंत्‍ययात्रेचे स्‍मरण म्‍हणून श्रद्धांजली वहाण्‍यासाठी मूकपदयात्रेचे आयोजन करण्‍यात आले होते. या पदयात्रेचा प्रारंभ श्री पांढरीचा मारुति मंदिर, चावडी चौक, आझाद चौक, शुक्रवार पेठ मार्गे कृष्‍णामाई येथील पवित्र कृष्‍णा-कोयनेच्‍या प्रीतीसंगमावर एकत्र येऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना सामूहिक श्रद्धांजली वहाण्‍यात आली.

पदयात्रेच्‍या प्रारंभी धर्मवीर ज्‍वाळा आणि भगवा ध्‍वज घेतलेले धारकरी होते. एकत्रित ध्‍येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्‍हणून राष्‍ट्र अन् धर्म कार्यासाठी कार्यरत रहाण्‍याची सामूहिक प्रतिज्ञा घेण्‍यात आली. या वेळी विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, राजकीय पक्षाचे मान्‍यवर, पदाधिकारी, हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि धारकरी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.