औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामांतराला विरोध करण्याचे प्रकरण !
आपल्या देशाची ऐतिहासिक परंपरा नष्ट करून परकीय आक्रमकांची परंपरा प्रस्थापित करण्याचा कुटील डाव आपण ओळखला पाहिजे. तो जर आपण ओळखू शकलो नाही, तर या देशात इस्लामिक सत्ता प्रस्थापित झाल्यावाचून रहाणार नाही. म्हणूनच अत्यंत सावधतेने वागून हा कुटील डाव आपण उधळून लावला पाहिजे.
असे लिहिण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ या शहराचे ‘संभाजीनगर’, असे नामकरण करण्यात आले. त्याला एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार विरोध केला आहे. हा विरोध करतांना एक कुटील डावही रचण्यात आला. तो म्हणजे विभागीय कार्यालयात आक्षेप घेणार्या आवेदन पत्राचे अभियान राबवण्यात आले आहे. या अभियानाच्या अंतर्गत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्यात आले, त्याला विरोध करणार्या आवेदन पत्रांची संख्या ११ सहस्र ८०२ एवढी, तर या नामांतराच्या बाजूने कौल देणार्या आवेदनांची संख्या केवळ ३५ आहे.
याचा अर्थ ‘जर नामांतराला विरोध करणार्या आवेदनांची संख्या अधिक असेल, तर त्या नामांतराला रहित करणे क्रमप्राप्त आहे’, असा दावा केला जाईल, म्हणजे जर संख्याबळाच्या जोरावर एखाद्या गोष्टीला विरोध केला, तर ती गोष्ट ‘सत्य कि असत्य ?’, याकडे लक्ष न देता केवळ विरोध करणार्यांची संख्या अधिक म्हणून सत्य असलेली गोष्ट सुद्धा भविष्यात नाकारण्याचा नवा पायंडा पडेल. ही गोष्ट राष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे.
१. परकीय आक्रमकाला हिंदुस्थानचा राष्ट्रपुरुष बनवण्याचा घाट !
आपल्या देशावर अनेक परकियांनी आक्रमणे केली. या दुष्टांनी भारतीय इतिहास विकृत केला. संस्कृती आणि धर्म नष्ट करण्याचे कुकृत्यही केले. या परकीय आक्रमकांचे वारसदार संख्याबळाच्या जोरावर सत्याला असत्य ठरवण्याचा आणि या देशाची ऐतिहासिक परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या देशाचा इतिहास सांगतो, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या देशाचे राष्ट्रपुरुष आहेत. औरंगजेब हा परकीय आक्रमक आहे.’’ या परकीय आक्रमकाला हिंदुस्थानचा राष्ट्रपुरुष बनवण्याचा घाट घातला जात आहे. त्याचाच भाग म्हणजे औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ या नामकरणाला होणारा विरोध आहे.
२. संख्याबळाच्या जोरावर निर्णय धुडकावून लावणे, ही राज्यघटनेची पायमल्ली
येथे लक्षात घ्यायला हवे की, जगातील कोणत्याही देशात संख्याबळाच्या जोरावर इतिहास पालटण्याचा प्रयत्न केला गेला नाही; पण आपल्या देशात तसा प्रयत्न केला जात आहे. म्हणूनच त्याला विरोध करणे नितांत आवश्यक आहे. ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’, असे नामकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाला केंद्रशासनाने मान्यता दिली. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा निर्णय न स्वीकारता केवळ संख्याबळाच्या जोरावर त्यांचा निर्णय पालटणे म्हणजे अस्तित्वात असलेल्या सरकारला नाकारणे होय. राज्यघटनेच्या चौकटीत राहून राज्य आणि केंद्र शासनाने घेतलेला निर्णय संख्याबळाच्या जोरावर धुडकावून लावणे, ही घटनेची पायमल्ली आणि त्याचप्रमाणे हा राष्ट्रद्रोह आहे.
३. संख्याबळापेक्षा गुण, वास्तवता आणि न्याय यांना अत्यंत महत्त्व !
बहुसंख्य लोकांनी कौल दिला; म्हणून असत्य सत्य ठरत नाही किंवा अन्याय न्याय्य ठरत नाही. सत्य आणि असत्य हे वस्तूस्थितीवर अवलंबून आहे. सत्य स्थिती बाजूला सारून आपल्याला हवा तसा निर्णय संख्याबळाच्या जोरावर प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा प्रयत्न करणे, हीच घटना लोकशाहीला बाधक आहे. संख्याबळ हे सर्वस्व आहे किंवा सर्वांत श्रेष्ठ आहे, असे मानण्याचे कारण नाही. संख्याबळापेक्षा गुण, वास्तवता आणि न्याय यांना अत्यंत महत्त्व आहे. याकडे डोळेझाक करता येणार नाही.
४. ‘जर औरंगजेब राष्ट्रपुरुष, तर छत्रपती संभाजी महाराज शत्रू ठरतील’, हे समाजाला स्पष्टपणे सांगणे आवश्यक !
‘लोकसंख्येच्या बळावर औरंगाबाद या शहराचे नाव संभाजीनगर असे करता येणार नाही’, असा निर्णय जर दिला गेला, तर त्याचा अर्थ असा होईल की, ‘औरंगजेब हा या देशाचा राष्ट्रपुरुष आहे. या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ करून त्यांची हत्या केली, ही अभिमानास्पद गोष्ट आहे’, असा होतो, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज हे हिंदुस्थानचे शत्रू ठरतात. तसेच ‘अफझलखानाचा वध करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक नसून त्याचे खुनी आहेत’, असा अर्थ होतो. यामुळे हिंदुस्थानच्या इतिहासाचे विकृतीकरण होते. या कारणास्तव संख्याबळाच्या जोरावर नामांतराला होणारा विरोध हाणून पाडला पाहिजे. तसेच संख्याबळावर अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेता येत नाही; कारण ते न्यायशास्त्र, नीतीशास्त्र आणि सत्य यांना, म्हणजेच पर्यायाने इतिहासाला धरून नाही. ही गोष्ट आपल्याला आपल्या समाजाला स्पष्ट करून सांगणे नितांत आवश्यक आहे.
५. …पुढे देशाचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करणे सहज शक्य
ज्या लोकांना परकीय आक्रमकांविषयी प्रेम वाटते आणि त्यांना राष्ट्रपुरुषांविषयी अभिमान वाटत नसेल, तर त्यांना या देशात रहाण्याचा अधिकार नाही; कारण असे लोक लोकशाहीच्या आडून या देशाचा इतिहास विकृत करण्याचा सातत्याने प्रयत्न करतील. या देशाचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करणे त्यांना सहज शक्य होईल. म्हणूनच अशा अपप्रवृत्तीला वेळीच ठेचणे अत्यंत आवश्यक आहे.
६. संख्याबळापेक्षा सत्य, न्याय आणि नैतिकता यांना अनुसरूनच निर्णय घेणे राष्ट्रहितैषी !
वास्तविक केंद्र आणि राज्य शासन यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करून पराभूत मानसिकता नष्ट करण्याचा दृढनिश्चय केल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजयाची परंपरा आरंभली आणि ती विजयाची परंपरा टिकवण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे हे हौतात्म्य विफल ठरू नये, यासाठीच संख्याबळाचा विचार न करता वास्तविकता, सत्य, न्याय आणि नैतिकता यांचा विचार करूनच निर्णय घेणे रास्त, राष्ट्रहितैषी, लोकशाही अन् राज्यघटना यांना अनुसरून आहे.
७. छत्रपती शिवरायांच्या लेखी औरंगजेब हा शत्रूच !
काही दिवसांपूर्वी एका नेत्याने आपल्या भाषणात ‘औरंगजेब आपला भाऊ आहे’, असे म्हटले आहे. औरंगजेब जर त्यांचा बंधू असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे शत्रू ठरतात. छत्रपती शिवरायांचा शत्रू हा या देशाचा शत्रू आहे; कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला आपला ‘भाऊ’, ‘बांधव’ कधीच म्हटले नाही. ‘छत्रपती शिवरायांच्या लेखी औरंगजेब हा शत्रूच होता’, असे इतिहास उच्चारवाने आपल्याला सांगतो. याच औरंगजेबाचे ‘हिंदवी स्वराज्य’ नष्ट करण्याचे स्वप्न होते की, जे त्याला साकार करता आले नाही.
८. क्रूर औरंगजेब राष्ट्रनिष्ठ हिंदुस्थानी नागरिकाचा भाऊ असणे अशक्य !
छत्रपती शिवरायांचा शत्रू असलेला औरंगजेब हा राष्ट्राभिमानी जनतेला प्रातःस्मरणीय वाटत नाही. औरंगजेब हा कधीही हिंदु राष्ट्रासाठी लढला नाही. त्याला या हिंदुस्थानात इस्लामी सत्ता प्रस्थापित करायची होती. त्यानेच काशी विश्वेश्वराच्या मंदिराचे मशिदीत रूपांतरित केले. असा हा धर्मांध, अत्यंत क्रूर, पाताळयंत्री कोणत्याही राष्ट्रभक्त वा राष्ट्रनिष्ठ हिंदुस्थानी नागरिकाचा भाऊ असू शकत नाही.
ज्यांना औरंगजेबाविषयी नितांत अभिमान वाटतो, त्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराजांविषयीही अभिमान वाटतो’, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले, तरी यावर हिंदुस्थानमधील सर्वसामान्य नागरिकांचा अजिबात विश्वास बसणार नाही.
९. आक्रमकांचा अभिमान वाटणारी विकृती नष्ट करण्यासाठी देहांत शिक्षा हेच एकमेव शासन !
‘संख्याबळाच्या जोरावर निर्णय घेऊन निकाल लावायचा’, असा पायंडा पडला, तर न्यायव्यवस्था अस्तित्वात रहाणार नाही. एखाद्या अपराध्याला बहुसंख्य लोकांनी निरपराध ठरवले; म्हणून त्याला शिक्षा करायची नाही. असे झाले तर न्यायपालिका अर्थहीन ठरेल. ‘हिंदुस्थानवर आक्रमण करणार्या कुणाही परकीय आक्रमकाविषयी ज्याला आत्मीयता, प्रेम, आपुलकी किंवा अभिमान वाटत असेल, त्याला ‘राष्ट्रद्रोही’ ठरवण्यात येईल. अशा राष्ट्रद्रोहाला केवळ ‘देहांत शिक्षा’, हेच एकमेव शासन असेल’, असा निर्बंध आपल्या देशात आणला पाहिजे, तरच अशी विकृत मानसिकता नष्ट होईल. असे कठोर निर्बंध अस्तित्वात आणून तेवढीच कठोर कारवाई करणे नितांत आवश्यक आहे.
– श्री दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१६.३.२०२३)