रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. वर्षा पंडित, जोगेश्‍वरी, मुंबई.

१ अ.‘हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांसंदर्भात आश्रमात मोठ्या प्रमाणात चालू असलेले कार्य कौतुकास्‍पद आहे !’ : ‘मी आतापर्यंत पाहिलेल्‍या ठिकाणांपैकी सर्वांत शांतता असलेले ठिकाण, म्‍हणजे हा आश्रम आहे. ‘आश्रमाला भेट देता येणे’, ही माझ्‍यासाठी सन्‍मानाची गोष्‍ट आहे’, असे मला वाटले. येथे हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांसंदर्भात एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेले कार्य कौतुकास्‍पद आहे. जगभरातील कोट्यवधी हिंदूंपर्यंत हे पोचवणे आवश्‍यक आहे. भविष्‍यात आश्रमाचा एक भाग होण्‍याचा माझा मानस आहे.’

(३०.११.२०२२)

२. वैद्या (कु.) शीतल भारत सागर,मु.पो. आटपाडी, जिल्‍हा सांगली.

अ. ‘आश्रमात आल्‍यावर मन अतिशय प्रसन्‍न झाले. मनाच्‍या शांतीसाठी अनुकूल, असे हे ठिकाण आहे.

आ. मला आश्रमात साधकांच्‍या वाणीतून प्रेमाचा गारवा प्रत्‍यक्षपणे अनुभवता आला.’ (२१.१.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार जिज्ञासूंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक