उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. रुद्र प्रशांत बाकडे हा या पिढीतील एक आहे !
‘फाल्गुन कृष्ण अष्टमी (१५.३.२०२३) या दिवशी वर्धा येथील कु. रुद्र प्रशांत बाकडे याचा १४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे वडील श्री. प्रशांत बाकडे आणि अन्य नातेवाईक यांना त्याच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
कु. रुद्र बाकडे याला १४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. श्री. प्रशांत बाकडे (कु. रुद्रचे वडील), वर्धा
‘वर्धा येथील साधकांच्या लहान मुलांसाठी प्रतिदिन ‘ऑनलाईन’ व्यष्टी साधनेचा आढावा सत्संग असतो. या आढाव्याला माझी दोन्ही मुले (कु. श्रेय (आध्यात्मिक पातळी ५४ टक्के, वय १० वर्षे आणि कु. रुद्र (वय १४ वर्षे)) नियमित उपस्थित असतात. पूर्वी ते दोघेही पुष्कळ मस्ती करायचे. लहान मुलांसाठी व्यष्टी साधनेचा आढावा सत्संग चालू झाल्यापासून रुद्रमध्ये पुष्कळ पालट झाला असल्याचे माझ्या लक्षात आले.
१ अ. कु. रुद्र आता शांत झाला आहे.
१ आ. इतरांना साहाय्य करणे : पूर्वी रुद्र घरातील कामे करण्यासाठी टाळाटाळ करायचा. आता त्याच्यामध्ये इतरांना साहाय्य करण्याचा भाग वाढला आहे.
१ इ. ऐकण्याची वृत्ती : पूर्वी तो कुणीही काहीही सांगितलेले लवकर ऐकत नसे; पण आता त्याला काही सांगितले, तर तो लवकर होकार देतो.
१ ई. त्याला आढाव्यात भावप्रयोग घ्यायला सांगितल्यावर तो उत्स्फूर्तपणे होकार देतो.
१ उ. तो नियमितपणे नामजपादी उपाय करतो.
१ ऊ. चुकांविषयी संवेदनशीलता : त्याच्याकडून चूक झाल्यास तो चूक स्वीकारतो आणि झालेल्या चुकीसाठी प्रायश्चित्त घेतो अन् ते पूर्णही करतो.
१ ए. त्याला कधी आध्यात्मिक त्रास झाल्यास तो श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांना आत्मनिवेदन करतो.’
२. श्रीमती विमल वसंतराव बाकडे (रुद्रची आजी, वडिलांची आई), वर्धा
अ. ‘तो स्वावलंबी होत आहे.
आ. तो भ्रमणभाषवर बोलतांना ‘हॅलो’, असे म्हणण्याऐवजी ‘नमस्कार’, असे म्हणतो.
इ. त्याच्यामध्ये प्रेमभाव वाढला असून त्याच्यात सर्वांना साहाय्य करण्याची वृत्ती निर्माण झाली आहे.
ई. आढावा चालू झाल्यापासून त्याच्या बोलण्यामध्ये नम्रता आणि गोडवा जाणवतो.
उ. रुद्रला नामजपाची गोडी लागली आहे. आता तो बराच वेळ नामजप करतो.
ऊ. रुद्रमध्ये चैतन्य आणि सात्त्विकता निर्माण झाल्याचे लक्षात येते.’
३. श्रीमती सुषमा पराते (कु. रुद्रची आत्या), नागपूर
अ. ‘रुद्र पूर्वी सतत काहीतरी खोड्या करायचा. त्याचा स्वभाव अतिशय तापट होता. तो पुष्कळ चिडचिड करायचा. आता तो पुष्कळ शांत झाला आहे.
आ. तो त्याच्या लहान भावावर (कु. श्रेयवर) पुष्कळ प्रेम करतो. श्रेयने मस्ती केली किंवा त्रास दिला, तरी रुद्र संयम ठेवण्याचा प्रयत्न करतो. कु. रुद्रमधील हा पालट पाहून परात्पर गुुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.
४. स्वभावदोष : राग येणे’
– श्री. प्रशांत बाकडे, वर्धा लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (२०.९.२०२१)