दोन्ही देशांत शांतता करार झाल्याची ट्रम्प यांची घोषणा
१९ जूनला दोन्ही देश करणार करारावर स्वाक्षरी
हॉर्मुझमधून तेलवाहतूक पुन्हा चालू होणार
इराणचे अद्यापही मौन, इस्रायलाही करार अमान्य

वॉशिंग्टन/तेहरान – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सामाजिक माध्यमाद्वारे अमेरिका आणि इराण यांच्यात १४ सूत्री शांतता करार झाल्याची घोषणा केली. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या १०७ दिवसांपासून चालू असलेले युद्ध संपणार असल्याचे अंततः स्पष्ट झाले. १९ एप्रिलला स्विझर्लंडमधील जिनिव्हा शहरात ट्रम्प यांच्या उपस्थितीत या शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद यावर अंतिम मोहोर उमटवेल आणि त्यानंतर या युद्धाची अधिकृत समाप्ती होईल.
हॉर्मुझची सामुद्रधुनीच्या भोवतीची नाकाबंदी हटवणार ! – ट्रम्प

हॉर्मुझची सामुद्रधुनीच्या (२ जलाशयांना जोडणार्या जलमार्गाच्या) भोवती अमेरिकेच्या नौदलाने केलेली नाकाबंदी पूर्णपणे हटवण्याचा आदेशही ट्रम्प यांनी त्यांच्या नौदलाला दिला आहे. त्यामुळे हॉर्मुझमधून पूर्वीप्रमाणे पुन्हा तेलवाहतूक होणार आहे. परिणामी जगभरातील अनेक देशांत निर्माण झालेले ऊर्जासंकट दूर होऊन ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला हातभार लागणार आहे.
इराणने मौन बाळगळ्यामुळे शांतता कराराविषयी प्रश्नचिन्ह !
ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेवर इराणने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पाकिस्ताननेही अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाल्याचे सांगण्यात आले; परंतु इराणने त्यावरही कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे शांतता कराराविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे.
डॉनल्ड ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सामाजिक माध्यमावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराची घोषणा केली आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणशी करार पूर्ण झाला आहे. सर्वांचे अभिनंदन. मी या माध्यमातून घोषणा करतो की, हॉर्मुझची सामुद्रधुनीही पुन्हा चालू होईल. मी अमेरिकी नौदलालाही नाकाबंदी हटवण्यास संमत्ती देत आहे. या सामुद्रधुनीतून इंधनाचा पुरवठा ज्या देशांना होतो, त्यांनी तेलवाहतूक चालू करावी.’
तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण : शेअर बाजारही सावरला
ट्रम्प यांच्या घोषणेमुळे तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून तेलाचे प्रति बॅरल ८३ डॉलरपर्यंत (७ सहस्र ८५४ रुपयांपर्यंत) खाली आल्याचे सांगितले जात आहे. यासह गेल्या अनेक दिवसांपासून पडलेला शेअर बाजारही सावरला आहे.
इस्रायलला करार अमान्य !
अमेरिकेने केलेला हा करारा इस्रायलला पूर्णपणे मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः अमेरिकेने लेबननवर आक्रमण थांबवण्याच्या केलेल्या करारावर इस्रायलचा आक्षेप असल्याचे सांगण्यात येते. या करारावरून इस्रायलच्या एका मंत्र्याने ‘इस्रायल अमेरिकाचा गुलाम नाही’, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
संपूर्ण प्रदेशात पुन्हा स्थिरता येईल ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचे स्वागत केले आहे. ते म्हणाले केले की, ‘पश्चिम आशियात चालू असलेला संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये झालेला करार, हे एक अत्यंत प्रशंसनीय पाऊल आहे. या युद्धामुळे जगभरात गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले असून अनेक देशांमध्ये जीवित आणि मालमत्ता यांची मोठी हानी झाली आहे. या शांतता कराराच्या कार्यवाहीमुळे संपूर्ण प्रदेशात पुन्हा स्थिरता येईल आणि समुद्रातील सुरक्षित नौकानयन अन् व्यापार पूर्ववत होईल.उर्वरित सूत्रांवर दोन्ही देशांनी चर्चा चालू ठेवावी आणि भविष्यात एक चिरस्थायी आणि सक्षम अंतिम करार व्हावा, अशी भारताची अपेक्षा आहे.’ |
काय आहेत करारातील १४ सूत्रे ?१. कच्चे तेल आणि पेट्रोकेमिकल्स यांसंबंधी इराणवरील निर्बंध हटवणार. २. इराणच्या वित्तीय संस्थांना पूर्ण अधिकार मिळेल, अमेरिका तिचे निर्बंध मागे घेईल. ३. ६० दिवसांमध्ये इराणचे गोठवण्यात आलेल्या २४ अब्ज डॉलरवरील (अनुमाने २ लाख २८ सहस्र कोटी रुपयांवरील) निर्बंध हटवणार. ४. इराणच्या पुणर्बांधणीसाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्र इराणला ३०० अब्ज डॉलर्सच्या (अनुमाने २८ लाख ३९ सहस्र ५९ कोटी रुपयांच्या) विविध योजनांद्वारे साहाय्य करतील. ५. लेबननविरुद्धचे युद्ध तातडीने थांबवले जाईल. ६. अमेरिका इराणच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे वचन देईल. ७. अमेरिकेने हॉर्मुझजवळ केलेली नाकाबंदी ३० दिवसांच्या आत पूर्णपणे हटवली जाईल. ८. अमेरिकेचे सैन्य इराणमधून परत जाईल. ९. हॉर्मुज सामुद्रधुनी पूर्ण सुरक्षेचा विचार करत ३० दिवसांच्या आत पुन्हा चालू होईल. १०. इराणच्या अणूकार्यक्रमाच्या सूत्राविषयी निर्णय घेण्यास ६० दिवसांचा चर्चेचा कालावधी असेल. ११. इराण अण्वस्त्रे सिद्ध न करण्याविषयीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल. १२. अमेरिका या प्रदेशातील सैन्य उपस्थिती न वाढवण्यास किंवा नवीन निर्बंध न लादण्यावर सहमती दर्शवेल. १३. या कराराच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवण्यासाठी एका यंत्रणेची व्यवस्था केली जाईल. कोणत्याही अंतिम कराराला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे मान्यता दिली जाईल. १४. इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम हा या कराराचा भाग नसेल. |

बांगलादेशातील शिवगंज उपजिल्ह्याचे नाव पालटून ‘महास्थान’ होणार !
Swiss Referendum : लोकसंख्या आणि स्थलांतर यांवरील निर्बंध आणण्याचा प्रस्ताव स्विस नागरिकांनी बहुमताने फेटाळला !
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव
Russian Oil Imports : भारत रशियाकडून इंधन खरेदी करणारा चीननंतरचा दुसरा सर्वांत मोठा खरेदीदार !
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi