पुणे येथे गावठी पिस्तूल विक्री करणारे ७ जण अटकेत !

पुणे – गुन्हे शाखा विभाग ६ आणि विभाग १ च्या पथकाने वेगवेगळ्या कारवाईमध्ये गावठी पिस्तूल विक्री करणार्‍या ७ सराईत आरोपींना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी हे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याकडून २३ लाख ८१ सहस्र रुपये मूल्यांची १७ गावठी बनावटीची पिस्तूले आणि १३ जिवंत काडतुसे, १ महिंद्रा कार आणि भ्रमणभाष असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.