होळीच्या शुभेच्छा देणार्‍या पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटूला मुसलमानांकडून विरोध !

इस्लाममध्ये होळीच्या शुभेच्छा देणे हराम असल्याची टीका !

पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहनवाज दहानी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटू शाहनवाज दहानी यांनी हिंदूंना  ट्वीट करून होळीच्या शुभेच्छा देतांना म्हटले होते, ‘जगभरातील सर्व प्रेमळ लोकांना, जे प्रेम, शांतता, आनंद, रंग आणि उत्सव यांवर विश्‍वास ठेवतात, त्या सर्वांना होळीच्या शुभेच्छा.’ यानंतर दहानी यांच्यावर धर्मांध मुसलमानांनी टीका करणे चालू केले  आहे. ‘होळीच्या शुभेच्छा देणे इस्लाममध्ये हराम आणि अपराध आहे. मुसलमान असतांना अशा शुभेच्छा देणे अयोग्य आहे’, अशी टीका त्यांनी केली आहे.

पाकचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनीही होळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्वीट करतांना म्हटले की, जय श्रीराम ! जभरातील सर्व लोकांना होळीच्या शुभेच्छा. जय सनातन धर्म !

संपादकीय भूमिका

या टीकेच्या विरोधात भारतातील निधर्मी, सर्वधर्मसभमाववाले, पुरोगामी मुसलमान, त्यांचे नेते, संघटना का बोलत नाहीत ? कि त्यांनाही असेच वाटते ?