जाब विचारणार्‍या मुलीच्‍या आईला धर्मांधाकडून जिवे मारण्‍याची धमकी

विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या धर्मांधावर गुन्‍हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

बीड – इयत्ता दहावीचा पेपर देऊन परीक्षा केंद्राबाहेर आलेल्‍या विद्यार्थिनीची छेड काढल्‍याच्‍या प्रकरणी आरोपी मोमीन रेहान फजलोद्दीन याच्‍याविरोधात शहर पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला. मुलीला शाळेतून घेऊन जाण्‍यासाठी आलेल्‍या आईने आरोपीला जाब विचारण्‍याचा प्रयत्न केला असता धर्मांधाने त्‍यांना शिवीगाळ करून जिवे मारण्‍याची धमकी दिली. हा धर्मांध युवक मागील ५ वर्षांपासून मुलीचा पाठलाग करून तिला बोलण्‍याचा प्रयत्न करत होता; मात्र भीतीमुळे मुलीने कुणालाही काही सांगितले नव्‍हते, असे पीडितेने दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे. (आतापर्यंत घडलेल्‍या ‘लव्‍ह जिल्‍हाद’च्‍या प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अशा ‘रोडरोमियों’चा कठोर बंदोबस्‍त करावा ! – संपादक)