भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी योगदान द्या ! – स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती

 ‘जय श्रीराम सेना’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांनी संयुक्तरित्या जियागुडा (तेलंगाणा) येथे आयोजित केली ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ !

डावीकडून ‘जय श्रीराम सेने’चे श्री. शांती किरण, श्री. चेतन गाडी आणि दीपप्रज्वलन करतांना स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती

भाग्यनगर (तेलंगाणा) – आपण ‘भगवद्गीते’तील ज्ञान आचरणात आणणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यात सांगितलेले धर्मसंस्थापनेचे कार्य करण्यासाठी, म्हणजेच भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे, असे उद्गार स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत काढले. जय श्रीराम सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २६ फेब्रुवारी या दिवशी जियागुडा येथील श्री केशव स्वामी महाराज मठाच्या मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. विनुता शेट्टी आणि समितीचे तेलंगाणा अन् आंध्रप्रदेश राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनीही संबोधित केले.

भारतीय संस्कृतीत ‘जय श्रीराम’, हेच जादुई शब्द ! – नितीन नंदकर, शहराध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

आजच्या युवकांच्या दृष्टीने जादुई करणारे शब्द म्हणजे ‘आय लव्ह यू’ किंवा ‘आय लाईक यू’, हे आहेत; पण त्यांना ठाऊक नाही की, भारतीय संस्कृतीत ‘जय श्रीराम’, हेच शब्द जादुई करणारे आहेत. त्यामुळे आपण भारतीय संस्कृती पुढे नेत त्या आधारावर हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे.