राष्‍ट्रघातकी लव्‍ह जिहाद !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘लव्‍ह जिहाद’ हा शब्‍द ‘लव्‍ह’  ‘जिहाद’ या अनुक्रमे इंग्रजी आणि अरबी शब्‍दांपासून बनला आहे.

लव्‍ह जिहादचा अर्थ काय ?

१. ‘लव्‍ह’ म्‍हणजे प्रेम. हे प्रेम ‘जिहाद’चा हेतू साध्‍य करण्‍यासाठी असल्‍याने ते फसवे असते.

२. ‘जिहाद’ म्‍हणजे सर्व जगावर इस्‍लामी राज्‍य प्रस्‍थापित करण्‍यासाठी मुसलमानांनी इस्‍लाम धर्म न मानणार्‍यांविरुद्ध पुकारलेले धर्मयुद्ध. ‘लव्‍ह जिहाद’ म्‍हणजे ‘धर्मांध मुसलमानांनी फसव्‍या प्रेमाच्‍या माध्‍यमातून हिंदू अन् ख्रिस्‍ती समाजांविरुद्ध पुकारलेले युद्ध’ असे सर्वसाधारणपणे म्‍हणता येईल.

युवतींच्‍या आयुष्‍याची राखरांगोळी करणारा लव्‍ह जिहाद !

‘लव्‍ह जिहाद’ म्‍हणजे एका पंथाच्‍या युवकांनी पूर्वनियोजित पद्धतीने हिंदु युवतींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून त्‍यांचे धर्मांतर करणे. यासाठी ते बहुतांशी वशीकरण आणि करणी यांचा उपयोग करतात. वशीकरणानंतर व्‍यक्‍तीचे नेहमीचे वागणे, बोलण्‍याची पद्धत, तोंडात बसलेले शब्‍द या सर्वांमध्‍ये पालट होऊन ज्‍या व्‍यक्‍तीला ती वश गेली आहे, तिला अनुकूल अशी होते. ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विळख्‍यात सापडलेल्‍या युवतींच्‍या आयुष्‍याची राखरांगोळी होते.

(हिंदु जनजागृती समितीचा ग्रंथ : लव्‍ह जिहाद)