पालखीमार्गातील काही गावांचा आध्यात्मिक अर्थ !

‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या ज्या गावांच्या मार्गे पंढरपूरला जातात, त्या गावांची नावेसुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

१. आळंदी : पालखी आळंदीतून निघते, आळंदी म्हणजे ‘आत्मानंद’ ! पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो.

२. पुणे : पालखी पुण्यात येते. पालखीसह जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन ‘पुण्य’ प्राप्त होते.

३. दिवेघाट : पालखी दिवेघाटातून सासवडकडे जाते. यम-नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांगयोगाच्या आचार‘दिव्या’तून जावे लागते.

४. वाल्हे : पालखी वाल्ह्यात येते. माणसाने वाल्हे म्हणजे कोमल, प्रेमळ आणि जिव्हाळासंपन्न झाले पाहिजे.

५. नातेपुते : ‘नातेपुते’ या गावी इतर नात्यांच्या मोहातून मुक्त होऊन भक्त फक्त श्री विठ्ठलाचा होतो.

६. वेळापूर : पालखीचा मुक्काम वेळापुरात होतो. ‘क्षणभरही वेळ वाया न घालवता विठ्ठलभजन केले पाहिजे’, हे ज्ञान येथे होते.

७. पंढरपूर : पालखी शेवटी पंढरपूर येथे जाऊन भक्त ‘पांडुरंगमय’ होतो.’

(संदर्भ : संकेतस्थळ)