साधकाला नामजप करतांना आलेल्‍या अनुभूती

श्री. अमित हावळ

मी देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात असतांना नामजप करतांना मधून मधून मला पुष्‍कळ ग्‍लानी येत असे. तेव्‍हा माझे डोळे मध्‍येच उघडले जायचे. मी ध्‍यानमंदिरात बसून नामजप करतांना मला ध्‍यानमंदिर पिवळसर आणि सोनेरी या रंगांच्‍या छटांनी प्रकाशमान झालेले दिसत असे. मी प.पू. भक्‍तराज महाराज यांनी वापरलेल्‍या चारचाकी वाहनाजवळ बसून नामजप करतांना मला सभोवतालचा परिसर पिवळसर आणि सोनेरी या रंगांच्‍या छटांनी प्रकाशमान झालेला दिसत असे. मला तिथे बसलेल्‍या साधकांचे चेहरेही सोनेरी, तेजस्‍वी आणि कांतीमान दिसत असत. त्‍या वेळी ‘मी एका वेगळ्‍याच विश्‍वात आलो आहे’, असे मला जाणवायचे. मला प्रसन्‍न, उत्‍साही आणि शांत जाणवत असे.’

– चरणसेवक, श्री. अमित हावळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक