‘कमरेला दुखापत झाल्याने मला बराच वेळ खोलीतच विश्रांती घ्यावी लागते. ४.१२.२०२२ या दिवशी ‘साधनेेचे प्रयत्न होत नाहीत’, या विचाराने माझे मन अस्वस्थ झाले होते. ‘आता भगवंत काय करील ? तसे वागायचे’, असा विचार करून मी खोलीत बसलो होतो. तेव्हा मला पुढील काव्य सुचले आणि मनाला आलेली मरगळ गेली. ते काव्य गुरुचरणी अर्पण करत आहे.
अधीर ते मन तुला पहाण्या ।
स्मरणात तुझ्याच रे रमण्या ॥ धृ. ॥
रूप तुझे घेई वेधूनी मजला ।
का खेळूनी चकविसी रे मजला ॥ १ ॥
भ्रमविसी आम्हा का रे श्यामा ।
फसलो बघ तुझिया या खेळा ॥ २ ॥
तूच उत्तर तूच प्रश्न ।
तुज लागोनी आहे विश्व ॥ ३ ॥
ये धावूनी ये रे रामा ।
तुझाच करितो रे धावा ॥ ४ ॥
राहू दे तव चरणी आता ।
हीच प्रार्थना तव चरणा ॥ ५ ॥
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, गोवा. (४.१२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |