गोव्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा माढा (जिल्‍हा सोलापूर) येथे भव्‍य नागरी सत्‍कार !

वर्गमित्र डॉ. अभयकुमार लुणावत यांनी केले सत्‍काराचे नियोजन

प्रतिकात्मक चित्र

माढा (जिल्‍हा सोलापूर) – महाराष्‍ट्रातील मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पूर्णपणे घटनात्‍मक असून या सरकारमुळे महाराष्‍ट्राचा सर्वांगीण विकास झाल्‍याविना रहाणार नाही, असे प्रतिपादन गोव्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. येथील त्‍यांचे वर्गमित्र डॉ. अभयकुमार लुणावत यांनी आयोजित केलेल्‍या भव्‍य नागरी सत्‍कार सोहळ्‍यात ते बोलत होते. या वेळी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्‍या हस्‍ते मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सत्‍कार करण्‍यात आला. या वेळी माजी आमदार धनाजीराव साठे अध्‍यक्षस्‍थानी होते.

या वेळी माढा तालुका डॉक्‍टर्स असोसिएशनच्‍या वतीने मुख्‍यमंत्री सावंत यांना सन्‍मानपत्र देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. या वेळी प्रमोद सावंत म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कौशल्‍य विकास’ योजना चालू केली असून त्‍यामुळे सशक्‍त आणि समृद्ध भारत निर्माण होण्‍यास साहाय्‍य होणार आहे.