हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची घोषणा आणि एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची पोटदुखी !

देशातील संत, संन्‍यासी आणि सर्वसामान्‍य हिंदू जनता सारेच ‘हे (भारत) हिंदु राष्‍ट्र आहे’, असे सातत्‍याने म्‍हणत आहेत. ‘हिंदुस्‍थान हिंदु राष्‍ट्र म्‍हणून घोषित करावा’, अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे. हिंदूंची ही एकजूट पाहून एम्.आय.एम्.चे खासदार बॅरिस्‍टर असदुद्दीन ओवैसी यांचे धाबे दणाणून गेले आहेत. त्‍यामुळे आता त्‍यांना डॉ. आंबेडकर यांची राज्‍यघटना आठवत आहे.

ओवैसी हे अधिवक्‍ता आहेत. गेली अनेक वर्ष ते खासदार आहेत आणि एम्.आय.एम्. या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. ते त्‍यांना हवा तो अर्थ काढण्‍यात पटाईत आहेत. ‘हे ‘हिंदु राष्‍ट्र’ होऊ नये’, अशी त्‍यांची इच्‍छा आहे. ‘हे हिंदु राष्‍ट्र झाले, तर या राष्‍ट्राचे इस्‍लामिक राष्‍ट्रात रूपांतर करता येणार नाही’, हीच त्‍यांची पोटदुखी आहे.

१. देश ‘निधर्मीवादी’ (सेक्‍युलर) असल्‍याचा परिणाम

वास्‍तविक पहाता मुसलमानांच्‍या वाढत्‍या कारवाया, आतंकवाद, जाळपोळ, दंगलखोर, ‘पाकिस्‍तान झिंदाबाद’, ‘भारत तेरे तुकडे होंगे’, या आणि अशा घोषणा; हिंदूंच्‍या सणांना मुसलमानांकडून होणारा विरोध, मशिदीवरून हिंदूंना मिरवणूक काढण्‍यास त्‍यांनी घातलेली बंदी या अन् अशा अनेक गोष्‍टी ज्‍या राष्‍ट्रघातक आहेत त्‍या सर्व धर्मांध मुसलमान करणार. त्‍याच्‍या विरोधात हिंदूंनी आवाज उठवायचा नाही; कारण हा देश ‘सेक्‍युलर’ (निधर्मीवादी) आहे.

देश स्‍वतंत्र झाल्‍यापासून किंबहुना त्‍या आधीपासूनच मुसलमान समाजाने पृथ्‍थकतेची (वेगळेपणाची) भूमिका बजावली आहे. मुसलमान समाज स्‍वतःला स्‍वतंत्र राष्‍ट्र समजतो. ‘आपली मान तोडली, तरी आपण ‘भारतमाता की जय’ म्‍हणणार नाही’, असे असदुद्दीन ओवैसी फुत्‍कारतात. त्‍या विरोधात कुणी काहीही बोलायचे नाही; कारण हा देश सेक्‍युलर आहे.

२. ‘वक्‍फ बोर्ड’ची वाटचाल इस्‍लामिक राष्‍ट्राच्‍या दिशेने !

सेक्‍युलरच्‍या नावाखाली हिंदूंना, हिंदु संस्‍कृती आणि धर्म यांना नष्‍ट करण्‍याचा छुपा डाव मुसलमानांचा आहे, हे न कळण्‍याइतपत हिंदू मूर्ख नाहीत. ‘मुसलमान वक्‍फ बोर्ड’ केवळ सरकारी भूमीच नव्‍हे, तर देशातील सर्व भूमी हळूहळू स्‍वतःच्‍या नावावर करून घेत आहे. मुसलमानांचे हे कृत्‍य म्‍हणजे इस्‍लामिक राष्‍ट्राची स्‍थापना करण्‍याच्‍या दिशेने चालू झालेली वाटचाल आहे. मुसलमानांच्‍या या क्रियेला हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची केलेली उद़्‍घोषणा म्‍हणजे संघटित झालेल्‍या हिंदू समाजाने दिलेली प्रतिक्रिया आहे. ‘हिंदू जसे सहिष्‍णू आहेत, तसेच ते जयिष्‍णू (सदोदित विजयी) आहेत’, हे मुसलमानांनी विसरू नये.

३. …त्‍या वेळी ओवैसींना देश सेक्‍युलर असल्‍याची आठवण का झाली नाही ?

काश्‍मीरमध्‍ये जिहादी मुसलमानांनी लक्षावधी हिंदूंची केलेली हत्‍या, त्‍यांच्‍या राक्षसी प्रवृत्तीमुळे आणि सरकारने कोणत्‍याही प्रकारचे संरक्षण न दिल्‍यामुळे तेथून हिंदूंना परागंदा व्‍हावे लागले. त्‍या वेळी ओवैसींना ‘हा देश सेक्‍युलर आहे’, याची आठवण झाली नाही.

४. मुसलमानांची वेगळेपणाची भूमिका हिंदूंना त्रासदायक

श्री. दुर्गेश परुळकर

मुसलमान या देशाची ऐतिहासिक परंपरा झुगारून देतात. याचा अनुभव हिंदूंनी अनेक वेळा घेतला आहे. मुसलमानांनी मुंबईतील वर्ष १८५७ च्‍या स्‍मारकाची केलेली तोडफोड, ‘वन्‍दे मातरम् म्‍हणणार नाही’, हा मुसलमानांचा दुराग्रह, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा औरंगजेब आणि अफझलखान आदी परकीय मुसलमान आक्रमकांविषयी मुसलमानांना वाटणारा जिव्‍हाळा या गोष्‍टी मुसलमान राष्‍ट्रीय प्रवाहापासून स्‍वतःला दूर ठेवत आहेत, याची प्रचीती देण्‍यास पुरेशा आहेत. मुसलमानांच्‍या या पृथ्‍थकतेच्‍या वृत्तीला आळा घातला नाही, तर हिंदू समाजाला सुखाने श्‍वास घेता येणार नाही.

५. राष्‍ट्रघातकी कृत्‍यासाठी घटनादत्त  अधिकारांचा वापर करणे हा देशद्रोह !

हिंदुस्‍थानची राज्‍यघटना हिंदू समाजाने ‘आपल्‍या धर्माचे पालन करू नये’, असे सांगत नाही. त्‍यासह देशातील नागरिकांना स्‍वतःच्‍या संरक्षणासाठी योग्‍य ती उपाययोजना करण्‍याची पूर्ण अनुमती घटनेने दिली आहे. ‘सेक्‍युलॅरिझम याचा अर्थ बहुसंख्‍यांक समाजाने अल्‍पसंख्‍यांक समाजाकडून छळ सहन करावा’, असा होत नाही. तसेच ‘अल्‍पसंख्‍यांक समाजाच्‍या राष्‍ट्रविघातक कृत्‍यांकडे बहुसंख्‍यांक समाजाने दुर्लक्ष करून डोळे मिटून गप्‍प बसावे’, असे राज्‍यघटना सांगत नाही. राज्‍यघटनेने प्रत्‍येकाला स्‍वतःच्‍या धर्माचे पालन करण्‍याची पूर्ण मुभा दिली आहे. त्‍यासह राष्‍ट्ररक्षणासाठी प्रयत्न करण्‍याचे पूर्ण स्‍वातंत्र्य प्रत्‍येक नागरिकांना दिले आहे. ते नागरिकाचे कर्तव्‍य म्‍हणून देण्‍यात आलेले स्‍वातंत्र्य आहे. ‘कर्तव्‍याकडे पाठ फिरवून राष्‍ट्रघातकी कृत्‍य करण्‍यासाठी आपल्‍या घटनादत्त अधिकारांचा वापर करणे’, हा देशद्रोह आहे. ही गोष्‍ट घटनातज्ञ आणि कायदे पंडित असलेल्‍या ओवैसींच्‍या लक्षात कशी येत नाही ?

६. मुसलमानांच्‍या फुटीरतेला लगाम घालण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र हवे !

‘१५ मिनिटे पोलिसांना बाजूला करा, आम्‍ही देशातील हिंदूंना नष्‍ट करून टाकतो’, अशा प्रकारची वल्‍गना असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी केली होती. त्‍यांची ही वल्‍गना घटनेच्‍या कोणत्‍या कलमानुसार योग्‍य ठरते ? अशी पार्श्‍वभूमी असलेल्‍या मुसलमानांच्‍या फुटीरता वृत्तीला लगाम घालण्‍यासाठी हिंदू समाजाला हिंदुस्‍थानचे हिंदु राष्‍ट्रात रूपांतर करण्‍याव्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणताही पर्याय आता उरला नाही.

७. ओवैसींना देशाची राज्‍यघटना आठवण्‍यामागील कारण

लव्‍ह जिहाद, भूमी जिहाद, अशा अनेकविध जिहादांनी ग्रासलेल्‍या देशाला या सर्वांतून मुक्‍त करण्‍यासाठी बहुसंख्‍यांक असलेल्‍या समाजाने देशाचे नागरिक म्‍हणून झटले पाहिजे. बहुसंख्‍यांक असलेल्‍या हिंदू समाजाला या देशात सुरक्षितपणे आणि अभिमानाने जीवन जगता आले पाहिजे. हा हिंदू समाजाचा म्‍हणजेच बहुसंख्‍यांक समाजाचा निसर्गदत्त अधिकार आहे. याला राज्‍यघटनाही विरोध करत नाही. ही गोष्‍ट अधिवक्‍ता असलेल्‍या ओवैसी यांना ज्ञात नाही, असे म्‍हणता येत नाही.

सेक्‍युलरचा विपरीत अर्थ काढून बहुसंख्‍यांक असलेल्‍या हिंदू समाजाला आपल्‍या टाचेखाली दाबून इस्‍लामी राष्‍ट्राची निर्मिती करण्‍याचे स्‍वप्‍न आता साकार होणार नाही. या भयापोटीच ओवैसी यांना आता देशाची राज्‍यघटना आठवत आहे.

८. ‘सेक्‍युलॅरिझम’चा अर्थ लावण्‍यापेक्षा राष्‍ट्रावर निष्‍ठा ठेवणे आवश्‍यक !

‘सेक्‍युलॅरिझम’ या शब्‍दाचा नेमका अर्थ असदुद्दीन ओवैसींना आता सांगण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे. सेक्‍युलॅरिझम किंवा निधर्मीवाद याचा अर्थ अल्‍पसंख्‍यांक असलेल्‍या समाजाने बहुसंख्‍यांक समाजाला उपद्रव देणे, असा होत नाही. तसेच कुणालाही आपल्‍या धर्माच्‍या नावाखाली देशाच्‍या निर्बंधांच्‍या चौकटीतून बाहेर पडता येत नाही. धर्मापेक्षा राष्‍ट्राला अधिक महत्त्व सेक्‍युलॅरिझमने दिले आहे. सेक्‍युलर देशाचा कारभार कोणत्‍याही धार्मिक ग्रंथांच्‍या मार्गदर्शक तत्त्वांवर करता येत नाही. प्रत्‍येकाने आपापल्‍या धर्माचे पालन करावे. आपल्‍या धर्माचे पालन करतांना राष्‍ट्राचे अहित होणार नाही, राष्‍ट्राचे स्‍वातंत्र्य, सार्वभौमत्‍व, शांतता आणि सुव्‍यवस्‍था यांना धक्‍का लागणार नाही, याची काळजी प्रत्‍येक धर्माच्‍या अनुयायांनी घेणे नितांत आवश्‍यक आहे; कारण तेच प्रत्‍येक नागरिकाचे राष्‍ट्रीय कर्तव्‍य आहे. रहदारीचे नियम धाब्‍यावर बसवून रस्‍त्‍यात नमाज पढणे, ही गोष्‍ट सेक्‍युलॅरिझममध्‍ये बसत नाही, याचे भान ओवैसींनी ठेवावे.

अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य केवळ अल्‍पसंख्‍यांक समाजाला हिंदुस्‍थानच्‍या राज्‍यघटनेने बहाल केलेले नाही. बहुसंख्‍यांक समाजाला सुद्धा तेवढेच अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य आहे जेवढे अल्‍पसंख्‍यांक समाजाला आहे; पण मुसलमान समाज ‘हिंदू समाजाला अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य आहे,’ असे मानतच नाही. अशा वर्तणुकीला सेक्‍युलॅरिझममध्‍ये स्‍थान नसते, हे ओवैसींनी लक्षात घ्‍यावे. म्‍हणून आपल्‍याला हवा तसा सेक्‍युलॅरिझमचा अर्थ लावण्‍याच्‍या फंदात ओवैसींनी पडू नये. त्‍यापेक्षा या राष्‍ट्रावर निष्‍ठा ठेवावी. या देशाची ऐतिहासिक परंपरा छत्रपती शिवरायांची, आर्य चाणक्‍यांची, पृथ्‍वीराज चव्‍हाणांची, महाराणा प्रतापांची, बंदा बैरागी यांची आहे. त्‍याचा स्‍वीकार करावा. अफझलखान, औरंगजेब वा त्‍याच्‍यासारख्‍या कोणत्‍याही परकीय सत्ताधीशांची ही परंपरा नाही, हेसुद्धा लक्षात घेऊन या देशात वावरावे.

९. ‘गझवा-ए-हिंद’चे (इस्‍लामीस्‍तानचे) ध्‍येय ठेवून प्रयत्न करणार्‍यांपासून देशाला धोका !

बाहेरच्‍या देशातील मुसलमानांनी अवैधपणे हिंदुस्‍थानात घुसखोरी करून देशाचे नागरिकत्‍व मिळवण्‍याचा प्रयत्न केला, तर त्‍याला विरोध करणे देशातील प्रत्‍येक नागरिकाचे राष्‍ट्रीय कर्तव्‍य आहे. तसे न करता ‘मुसलमान घुसखोरांना या देशाचे नागरिकत्‍व देण्‍याचा आग्रह धरणे, त्‍यांचा कैवार घेणे या सर्व गोष्‍टी मुसलमानांचे संख्‍याबळ वाढवून हा देश इस्‍लामी राष्‍ट्रात रूपांतर करण्‍याचा त्‍यांचा प्रयास आहे’, हे आता लपून राहिलेले नाही. मुसलमान समाजासमोर ‘गझवा-ए-हिंद’चे ध्‍येय ठेवणारे आणि ते गाठण्‍यासाठी प्रयत्न करणारे या सार्‍यांपासून या देशाला धोका आहे. या सर्वांपासून देशाचे संरक्षण करण्‍यासाठी हिंदू समाज धडपडत असेल, तर ही धडपड घटनाबाह्य नाही. राज्‍यघटना ‘राष्‍ट्राचे संरक्षण करू नये’, असे सांगत नाही. ही गोष्‍ट कायदेपंडित आणि घटनातज्ञ असलेल्‍या ओवैसी यांनी ध्‍यानात घ्‍यावी.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (१६.२.२०२३)