|
रत्नागिरी – वर्ष २००१ आणि वर्ष २०११ या २ जनगणनांच्या आकडेवारीतील तुलनेतून जिल्ह्यातील हिंदूंसह ख्रिस्ती, शीख, बौद्ध, जैन आदींची लोकसंख्या घटली असून मुसलमान पंथियांची लोकसंख्या मात्र वाढली असल्याची माहिती उघड झाली आहे. हिंदु धर्मियांची लोकसंख्या ८३ सहस्र ९२६ ने न्यून झाली असून मुसलमान समाजाची लोकसंख्या ११ सहस्र ५२५ ने वाढली आहे.
वर्ष २००१ च्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात ६ लाख ५० सहस्र ६७७ हिंदु पुरुष आणि ७ लाख ४० सहस्र ४०७ महिला, अशी एकूण १३ लाख ९१ सहस्र १३७ हिंदु जनसंख्या होती. ही हिंदु लोकसंख्या वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार १३ लाख ७ सहस्र २११ इतकी आहे. यामध्ये ६ लाख १६ सहस्र २५४ पुरुष आणि ६ लाख ९० सहस्र ९५७ महिलांचा समावेश आहे.
वर्ष २००१ च्या जनगणनेनुसार एकूण मुसलमान लोकसंख्या १ लाख ७५ सहस्र ६७२ होती. त्यामध्ये ८२ सहस्र ५१९ मुसलमान पुरुष, तर ९३ सहस्र १५३ महिलांचा समावेश आहे. त्यानंतर वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार मुसलमान लोकसंख्या १ लाख ८७ सहस्र १९७ झाली आहे. यामध्ये ८७ सहस्र ८६४ पुरुष, तर ९९ सहस्र ३३३ महिला आहेत.
अन्य धर्मियांची लोकसंख्या
जिल्ह्यात बौद्ध समाजाची लोकसंख्याही न्यून झाली आहे. वर्ष २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात १ लाख २० सहस्र ८५५ बौद्ध लोकसंख्या होती. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार ही लोकसंख्या १ लाख १३ सहस्र ४६७ इतकी झाली आहे. ख्रिस्ती लोकसंख्या वर्ष २००१ च्या जनगणनेत २ सहस्र ८६६ होती, ती २०११ च्या जनगणनेत १ सहस्र ९९० इतकी झाली आहे. शीख लोकसंख्याही २००१ ला ७१२ होती. ती २०११ च्या जनगणनेत २३० झाली आहे. जिल्ह्यात २००१ जैन समाजाची लोकसंख्या ४ सहस्र २२७ होती. वर्ष २०११ च्या जनगणनेत ती ३ सहस्र ३४७ इतकी झाली आहे.
लोकसंख्येत महिला अधिक
जिल्ह्यातील हिंदु, मुसलमान, तसेच बौद्ध लोकसंख्येमध्ये पुरुषांपेक्षा महिला अधिक आहेत. त्याच वेळी ख्रिस्ती, शीख, जैन यांसह अन्य पंथियांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिकमुसलमान आहेत.
संपादकीय भूमिका
|