‘२४.२.२०२२ या गुरुवारी झालेल्या महाशिवरात्रीच्या विशेष भक्तीसत्संगाच्या ठिकाणी मला पुष्कळ शक्ती जाणवत होती. माझे गाढ ध्यान लागले होते. मला केवळ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज ऐकू येत होता. मी बसलेल्या ठिकाणी पंखा चालू नव्हता, तरीही मला पुष्कळ थंडी वाजून अंगावर रोमांच येत होते. कैलास पर्वताची माहिती ऐकत असतांना मला पुष्कळ थंडी वाजली. सत्संगात मानस भावाने कैलासाचे दर्शन घ्यायला सांगितले. तेव्हा ‘मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जात आहे आणि तेथील वातावरण अनुभवत आहे’, असे मला जाणवले.’
– कु. श्रीनिवास देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ११ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |