अश्‍लील लावणीचे सूत्र अधिवेशनात मांडणार ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

मुंबई – राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या पदाधिकार्‍याने सध्‍या अश्‍लीलतेचा आरोप असलेल्‍या गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम ठेवल्‍याचे सूत्र पुढे आल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर ‘अश्‍लील लावणीचे सूत्र अधिवेशनात मांडणार’, अशी चेतावणी दिली आहे.

या संदर्भात पवार यांनी पुढे म्‍हटले की, हे महाराष्‍ट्राच्‍या संस्‍कृतीला कमीपणा आणणारे आहे. महाराष्‍ट्राची लावणी परंपरा आहे; पण ते कार्यक्रम सर्वांना पहाता येतील, अशा प्रकारे आयोजित केले पाहिजेत. त्‍यामध्‍ये कोणताही अश्‍लील प्रकार होता कामा नये. दुर्दैवाने मला काल अशी माहिती मिळाली की, काही जिल्‍ह्यांमध्‍ये अशा कार्यक्रमांवर बंदी आहे; पण काही जिल्‍ह्यांत ते चालू आहे. मेघा घाडगे यांनी पवार यांच्‍याकडे पाटील यांची तक्रार केली होती.

याविषयी गौतमी पाटील यांनी क्षमायाचना केल्‍याचे आणि पुन्‍हा ती चूक केली नसल्‍याचे स्‍पष्‍टीकरण दिले आहे. पवार यांनी वरील चेतावणी दिल्‍यावर गौतमी पाटील यांनी त्‍यांची हात जोडून क्षमा मागितल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • अजित पवार पक्षाच्‍या पदाधिकार्‍यावर काय कारवाई करणार ? हेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले पाहिजे !
  • अश्‍लील कार्यक्रमांचे आयोजन करणारे पदाधिकारी असणारे पक्ष राज्‍य काय घडवणार ?