नगर – शहराजवळील मिरावली पहाडावर मच्छिंद्रनाथांचे पुत्र मिनीनाथांची समाधी आहे; मात्र तेथे मदरशाचे अतिक्रमण झाले असून, स्थानिकांना पूजा-अर्चेला विरोध होत आहे. तेथील ८० ते ९० वर्षे वयाची ज्येष्ठ मंडळी येथे मिनीनाथ समाधीस्थळ असल्याच्या आठवणी सांगतात. यामुळे मिनीनाथ समाधीस्थळाचे शुद्धीकरण करण्याची मागणी हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी येथे केली. या देवस्थानाविषयी येत्या १५ दिवसांत व्यापक बैठक आणि सभा घेणार असून जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार आहोत. त्यानंतरही तेथील जागेचे शुद्धीकरण न झाल्यास पुढील पवित्रा घेणार आहे. तसेच मिरावली बाबा कोठून आले ? त्यांचा इतिहास काय ? हे स्पष्ट करण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते.
या वेळी श्री. धनंजय देसाई पुढे म्हणाले की,
१. नवनाथांच्या पोथीमध्ये मिनीनाथांचा उल्लेख आहे. मिरावली पहाड हे हिंदु तीर्थक्षेत्र आहे. भारतात आध्यात्मिक क्षेत्रातही बाटवाबाटवी झाल्याची अनेक उदाहरणे अयोध्या आणि काशीच्या ज्ञानव्यापी मंदिरातून समोर आली आहेत. तसेच मिनीनाथ देवस्थानाविषयीही झाले आहे. त्यामुळे तेथे हिंदूंना पूजा-अर्चा करण्यास पोलीस आणि महसूल प्रशासन यांनी दडपशाही करू नये.
२. काँग्रेसने पाकिस्तानची निर्मिती करून पहिली गद्दारी केली आणि नंतर देशात वक्फ बोर्ड सिद्ध करून दुसरी गद्दारी केली. या बोर्डाने अनेक ठिकाणी आरक्षणे टाकली आहेत; पण हे बोर्डच असंवैधानिक आहे. राज्यघटना मानणार्यांनी वक्फ बोर्डाला मानणे चुकीचे आहे. या बोर्डाची मान्यता रहित नव्हे, तर बोर्डच नष्ट करा, अशी मागणी देसाई यांनी केली. अशी मागणी देसाई यांनी केली. (तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड अधिनियम १९९५’द्वारे मुसलमानांना पाशवी अधिकार दिले आहेत. एका मोठ्या षड्यंत्राद्वारे देशभरातील भूमी हडपण्याचा अतिशय गंभीर प्रकार वक्फ कायद्याच्या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे आतातरी सरकारने लँड जिहादसाठी प्रोत्साहन देणारा ‘वक्फ ॲक्ट’ रहित करावा ! – संपादक)
३. नगर जिल्ह्याच्या ‘अहिल्यादेवीनगर’ नामांतरास पाठिंबा देतांना ‘या निर्णयाची तातडीने कार्यवाही करावी’, अशी मागणी देसाई यांनी केली.
संपादकीय भूमिकाआतापर्यंत गड-दुर्ग यांवर अवैधपणे थडगी उभारणार्या धर्मांधांची कुदृष्टी आता मंदिरावरही पडत आहे. निद्रिस्त हिंदूंनी आतातरी जागृत होऊन धर्मांधांचे हे ‘भूमी जिहाद’चे षड्यंत्र मोडून काढावे ! |