गाझियाबाद न्‍यायालयात घुसला बिबट्या !

बिबट्याच्या हल्यात घायाळ झालेले वकील व इतर

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील न्‍यायालय परिसरात अचानक बिबट्या घुसल्‍याने गोंधळ उडाला. यामुळे एका पोलिसासह ६ हून अधिक लोक घायाळ झाले. बिबट्या घुसल्‍याची माहिती सर्वत्र पसरल्‍यावर अधिवक्‍त्‍यांनी त्‍यांची कार्यालये बंद केली. तसेच याची माहिती वन विभाग आणि पोलीस यांना देण्‍यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत बिबट्याला पकडण्‍याचा प्रयत्न केला जात होता.