बलायदुरी (जिल्‍हा नाशिक) येथे शिपायाकडून ५० सहस्रांची लाच घेतांना सरपंच आणि ग्रामसेविका यांसह एकाला अटक !

नाशिक – इगतपुरी तालुक्‍यातील बलायदुरी ग्रामपंचायतीच्‍या निवृत्त शिपायाकडून रहिवास भत्ता संमत करण्‍यासाठी ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना सरपंचासह ग्रामसेविका आणि एक नागरिक यांना रंगेहात पकडून ८ फेब्रुवारी या दिवशी अटक करण्‍यात आली आहे. सरपंच हिरामण दुभाषे, ग्रामसेविका आशा गोडसे आणि नागरिक मल्‍हारी गटकळ अशी त्‍यांची नावे आहेत. तक्रारदार हे बलायदुरी ग्रामपंचायतीचे शिपाई असून जून २०२० मध्‍ये ते निवृत्त झाले आहेत. ग्रामपंचायतीकडून त्‍यांना १ लाख ६४ सहस्र ६८२ रुपये भत्त्याच्‍या देयकाची रक्‍कम मिळणे बाकी होते. या रकमेचा धनादेश बनवून देण्‍यासाठी गोडसे आणि दुभाषे यांनी लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली.

संपादकीय भूमिका

भ्रष्‍टाचाराने पोखरलेली ग्रामपंचायत !