संकटाच्या वेळी भारताने खरी मैत्री निभावली ! – श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने

श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने

कोलंबो (श्रीलंका) – संकटाच्या वेळी भारताने आमच्याशी खरी मैत्री निभावली, असे विधान श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी येथे केले. ‘टाटा टिस्कॉन डीलर कन्वेंशन २०२३’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी भारतीय आस्थापनांना श्रीलंकेमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.