महाराष्‍ट्रात नसबंदीची आवश्‍यकता असणार्‍या ५ लाख पुरुषांपैकी केवळ ८ सहस्र ६९८ जणांनीच केली शस्‍त्रक्रिया !

नागपूर – महाराष्‍ट्रात अपसमज आणि पौरुषत्‍व यांच्‍या खुळामुळे नसबंदी शस्‍त्रक्रियेेत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जात आहे. महाराष्‍ट्रात ५ लाख पुरुषांची नसबंदी शस्‍त्रक्रिया अपेक्षित असतांना ८ सहस्र ६९८ पुरुषांनीच ही शस्‍त्रक्रिया करून घेतली. महिलांच्‍या कुटुंबनियोजन शस्‍त्रक्रियेची टक्‍केवारी ५० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत असतांना पुरुष नसबंदीचे प्रमाण केवळ १६ ते १७ टक्‍के आहे. कुटुंब नियोजन शस्‍त्रक्रियांमध्‍ये महिलाच आघाडीवर आहेत. वर्ष २०१८-१९ मध्‍ये राज्‍यात ५ लाख १५ सहस्र ५०० महिलांची कुटुंबनियोजन शस्‍त्रक्रिया करणे अपेक्षित होती. प्रत्‍यक्षात ३ लाख ९० सहस्र २९१ महिलांची शस्‍त्रक्रिया झाली. वर्ष १९७७ पर्यंत स्‍थानिक प्रशासनाला कुटुंबनियोजन शस्‍त्रक्रिया, तसेच नसबंदीचे उद्दिष्‍ट देण्‍यात येत होते. सरकारी पातळीवर शिबिरे घेऊन शस्‍त्रक्रिया केल्‍या जात आहेत. त्‍यामुळे कुणावरही बळजोरी करता येत नाही, असे संबंधितांनी सांगितले.