मुंबईत २६ नोव्हेंबरप्रमाणे आतंकवादी आक्रमण करण्याची ‘ट्विटर’द्वारे धमकी !

मुंबई – मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ प्रमाणे आतंकवादी आक्रमण करण्याची धमकी ‘ट्विटर’वरून देण्यात आली आहे. गुजरातमधील जयुका नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिल्याचे समजते. त्यात तिचा भ्रमणभाष क्रमांक आणि पत्ताही दिलेला आहे. हा खोडसाळपणा असण्याची शक्यता पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.