तुळजापूर (धाराशिव) – ‘आर्ट ऑफ लिव्हींग’चे संस्थापक धर्मगुरु श्री श्री रविशंकर यांच्या ‘जागर भक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी श्री श्री रविशंकर यांच्याविरोधात घोषणा दिल्या. श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानावरून संभाजी ब्रिगेडने आंदोलनाची चेतावणी दिली होती. या कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. तरीही काही कार्यकर्त्यांनी श्री श्री रविशंकर यांना काळे झेंडे दाखवत घोषणा दिल्या. या प्रकारानंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे !
श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे !
नूतन लेख
जिल्ह्यात येणार्या पर्यटकांना पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही ! – प्रवीण पवार, महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र
मोगलांचे उदात्तीकरण करणार्या ‘ताज : डिव्हाइडेड बाय ब्लड’ या वेब सिरीजवर बंदी घाला !
राज्यात शिष्यवृत्तीचे १४ सहस्र ५७७ अर्ज प्रलंबित ! – उच्च शिक्षण सहसंचालकांची माहिती
#Exclusive : राजापूर (रत्नागिरी) बसस्थानकातील पडक्या उपाहारगृहामुळे कर्मचारी आणि प्रवासी यांचा जीव दावणीला बांधलेला !
वृक्ष लागवड आणि संवर्धन यांसाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्ट्रात साजरा करू ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती