चर्चमध्ये मेणबत्ती पेटवली की, सर्व पापे धुतली जातात !

बाडमेर (राजस्थान) – इस्लामचा अर्थ केवळ नमाजपठण करणे, हा आहे. इस्लाममध्ये ५ वेळा नमाजपठण केल्यावर काहीही करू शकता; मग हिंदु मुलींना उचलून न्या अथवा आतंकवादी बनून मनात येईल ते करा. असेच ख्रिस्ती धर्मातही आहे. चर्चमध्ये मेणबत्ती पेटवली की, सर्व पापे धुतली जातात, अशी विधाने योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे एका कार्यक्रमात केली. ‘कुराण आणि बायबल यांमध्ये मात्र असे काहीही शिकवले जात नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. येथील पनोणियामध्ये धर्मपुरी महाराज मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आचार्य स्वामी अवधेशानंद गिरि उपस्थित होते.
‘5 वक्त की नमाज पढ़ो, फिर चाहे हिन्दू लड़कियों को उठाओ या आतंकी बनो – सब जायज’: बोले बाबा रामदेव – हूर-मदिरा वाली जन्नत से तो जहन्नुम से भी बेकार#BabaRamdev #Muslims #Barmerhttps://t.co/0oi4oFBFPV
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 3, 2023
योगऋषी रामदेवबाबा यांनी मांडलेली सूत्रे
१. ५ वेळा नमाजपठण केल्यानंतर ‘जन्नत’ (स्वर्ग) मिळते. जन्नतमध्ये मद्य आणि अप्सरा मिळत असतील, तर अशी ‘जन्नत’ ‘जहन्नुम’पेक्षा (नरकापेक्षा) वाईट आहे. सर्व जातीतील लोकांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
२. कुणी संपूर्ण जगाला इस्लाममय करण्याच्या गोष्टी करतो, तर कुणी जग ख्रिस्तमय करण्याचे सांगतो. काही जण मिशा काढून टाकतात आणि गोल टोपी घालतात. हा मूर्खपणा आहे. लोक याच विचारात राहून सर्व जगाला इस्लाममय करण्याचा प्रयत्न करत आहेत.
३. मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यामध्ये असे कोणतेही धोरण नाही; मात्र तरीही ते जगात त्यांच्या धर्मांचे प्रस्थ निर्माण करण्याच्या गोष्टी करतात.
४. हिंदु धर्म काय सांगतो, तर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठा. योगसने करा. ईश्वराचे किंवा आपल्या आराध्याचे ध्यान करा. दिवसभरात चांगले कर्म करा. धर्माचरण करा, जिवांची सेवा करता. हाच सनातन धर्म आहे.
कॉकरोच जनता पक्ष परकीय शक्तींचा पाठिंबा असलेली यंत्रणा ! – RSS Leader Indresh Kumar
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !