म्‍हैसाळ (जिल्‍हा सांगली) येथेही हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन !

म्‍हैसाळ येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात सहभागी हिंदुत्‍वनिष्‍ठ

‘श्रीराम आणि श्रीरामचरितमानस यांचा अवमान करणार्‍यांना त्‍वरित अटक करण्यात यावी’ या मागणीसाठी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने म्‍हैसाळ येथे ३० जानेवारीला आंदोलन करण्‍यात आले. या प्रसंगी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. सुरेश लडगे, स्‍वामी समर्थ मंडळाच्‍या अपर्णा सुतार, हिंदुत्‍वनिष्‍ठ सर्वश्री विश्‍वनाथ धुमाळ, शेखर सुतार, दत्तात्रय शिंदे यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्‍थित होते. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीच्‍या श्रीमती मधुरा तोफखाने, कु. प्रतिभा तावरे आणि श्री. संतोष देसाई यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. आंदोलनात झालेल्‍या मागण्‍यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ३१ जानेवारीला सांगली येथे निवासी उपजिल्‍हाधिकारी मौसमी बर्डे यांना देण्‍यात आले.

विशेष

आंदोलन चालू असतांना आजूबाजूला असलेले अनेक लोक थांबून विषय ऐकत होते.

या प्रसंगी करण्‍यात आलेल्‍या अन्‍य मागण्‍या…

१. जैन पंथियांचे श्रद्धास्‍थान सम्‍मेद शिखरजी तीर्थक्षेत्र म्‍हणून घोषित करावे.

२. महाराष्‍ट्रात ‘लव्‍ह जिहादविरोधी कायदा’, तसेच ‘धर्मांतरविरोधी कायदा’ लागू करावा.

३. वक्‍फ बोर्डाला देशातील भूमी बळकावण्‍याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करावा.