१. ‘रामनाथी आश्रम पाहून माझ्या मनात ‘ॐ’काराचा नाद घुमत असल्याची जाणीव झाली. त्या वेळी मला आश्रमातील सर्वांविषयी अपार प्रेम वाटू लागले.
२. ध्यानमंदिरात पाऊल ठेवताच क्षणी एका अनोख्या शक्तीची जाणीव झाली. ती शक्ती अवर्णनीय आहे.’
– श्री. गजेंद्र कुमार सिंह (निवृत्त सैनिक), हिलक्रेस्ट अपार्टमेंट, मंगूर हिल, वास्को द गामा. (२६.४.२०२२)
३. ‘रामनाथी आश्रमाचे वातावरण अत्यंत शांत, स्वच्छ आणि आनंदमयी आहे.’
– श्री. कपिल दुआ, इलाईट इंजिनीयर्स, (मालक आणि दिग्दर्शक), ७ अनाज मंडी, पानिपत.
४. ‘सनातनच्या रामनाथी आश्रमातील सर्वच गोष्टी पुष्कळ चांगल्या आहेत. श्रद्धा आणि निःस्वार्थ भावाने चालणारे येथील कार्य पुष्कळ चांगले आहे.’
– श्री. शोभनाथ गुप्ता, डेहराडून (६.११.२०२२)
५. ‘अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशा आश्रमात जेथे विभिन्न क्षेत्रांतील सर्व साधक एका ठिकाणी हिंदु धर्माचा प्रचार आणि रक्षण करतात. कार्य अती उत्तम आहे.’
– श्री. कमल रामचंद्र ठाकूर, नगरसेवक, नंदुरबार नगरपरिषद तथा भाजपचे उत्तर महाराष्ट्र ग्रामीण विकास सहसंयोजक, नंदुरबार, महाराष्ट्र. (२२.११.२०२२)
रामनाथी (गोवा) येथील सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेलेे अभिप्राय
१. सूक्ष्म-जगतासंबंधीचे प्रदर्शन हे आत्मज्ञान करण्याच्या दिशेने अत्यंत उत्कृष्ट कार्य आहे.’ – श्री. कपिल दुआ, पानिपत. (६.११.२०२२)
२. सूक्ष्म-जगतासंबंधीचे प्रदर्शन मला अत्यंत प्रेरणादायी वाटले आणि माझ्या अंतरात एक प्रेम जागृत झाले. त्याचे वर्णन शब्दांत व्यक्त करणे मला अशक्य आहे.’ – श्री. गजेंद्र कुमार सिंह (निवृत्त सैनिक), वास्को द गामा. (२६.४.२०२२)
|