नृत्‍याचा सराव करतांना साधिकेला आलेल्‍या अनुभूती     

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

१. परात्‍पर गुरु डॉ. आठवले श्रीरामाच्‍या रूपात दिसून रामनामाचा जप चालू होणे

‘१६.२.२०१९ या दिवशी नृत्‍याचा सराव करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले श्रीरामाच्‍या रूपात दिसून माझा रामनामाचा जप चालू झाला. त्‍याच वेळी मला एक खारूताई ३ वेळा दिसली. हा मला दैवी योग वाटला आणि त्‍यामुळे मला आनंदही झाला.

२. अनाहतचक्राच्‍या स्‍थानी प्रकाशाचे वलय फिरतांना दिसणे आणि ते वलय आज्ञाचक्राजवळ आल्‍यावर ‘तेथे अनेक पाकळ्‍यांचे कमळ फुलले आहे’, असे दिसणे

नृत्‍याचा सराव संपल्‍यावर माझ्‍या अनाहतचक्राच्‍या स्‍थानी प्रकाशाचे वलय फिरतांना दिसले. ते वलय आज्ञाचक्राजवळ आल्‍यावर ‘तेथे अनेक पाकळ्‍यांचे कमळ फुलले आहे’, असे मला दिसले. तेव्‍हा ‘शरीर हलके झाले आहे’, असे मला वाटले. त्‍या वेळी मला स्‍थूलदेहाची जाणीव नव्‍हती.

३. अनाहतचक्रातून श्रीरामाच्‍या नामजपाची अक्षरे प्रकाशात रूपांतरित होऊन तो नामजप आज्ञाचक्राच्‍या ठिकाणी स्‍थिरावणे आणि तेथे एक ज्‍योत दिसणे

त्‍यानंतर अनाहतचक्रातून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ या नामजपाची अक्षरे प्रकाशात रूपांतरित होऊन तो नामजप माझ्‍या आज्ञाचक्राच्‍या ठिकाणी स्‍थिरावला. मला तेथे ज्‍योत दिसली. ती ज्‍योत काही क्षण आकाशाच्‍या दिशेने जातांना दिसली. नंतर ‘ज्‍योतस्‍वरूप मी आकाश आणि पृथ्‍वी यांच्‍या मधल्‍या पोकळीत आहे’, असे जाणवले.

४. काही वेळाने रामनाथी आश्रमाच्‍या साधारण १७ फूट वर एक योगी पुरुष पद्मासनात बसलेले दिसले. त्‍यांनी मला आशीर्वाद दिले.

५. स्‍वतः एका राजाच्‍या रूपात दिसणे, काही अंतरावर प.पू. देवरहाबाबा आणि त्‍यांच्‍या समवेत चार महात्‍मे दिसणे, त्‍यांनी आशीर्वाद दिल्‍यावर एका देवतेने येऊन साधिकेला हिंदु राष्‍ट्राचा एक ध्‍वज देणे

काही वेळाने मी एका राजाच्‍या रूपात दिसले. मी श्‍वेत रंगाच्‍या अश्‍वावर आरूढ होते. तो अश्‍व आकाशाच्‍या दिशेने जात होता. काही अंतरावर मला गळ्‍यात हार घातलेले प.पू. देवरहाबाबा (किन्‍निगोळी, कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबांचे गुरु) ध्‍यानस्‍थितीत बसलेले दिसले. त्‍यांनी मला आशीर्वाद दिला. त्‍यांच्‍या शेजारी चार महात्‍मे होते. प.पू. देवरहाबाबांनी फिकट पिवळसर रंगाचे आणि अन्‍य चार महात्‍म्‍यांनी श्‍वेत वस्‍त्र धारण केलेले होते. त्‍यांनी आशीर्वाद दिल्‍यावर त्‍या ठिकाणी एक देवता आली. तिने हिंदु राष्‍ट्राचा एक ध्‍वज मला दिला. ‘केवळ पृथ्‍वीवरच नव्‍हे, तर सर्व उच्‍च लोकांतही हिंदु राष्‍ट्राची निर्मिती होत आहे’, असे त्‍या देवतेने मला सांगितले. त्‍या वेळी मला ध्‍वजावर आकाशाच्‍या पोकळीतून फुले उधळल्‍याचे दिसले.

६. सद़्‍गुरु डॉ. पिंगळेकाकांचे दर्शन होणे आणि ‘५ दिव्‍यात्‍मे सद़्‍गुरु डॉ. पिंगळेकाकांना सूक्ष्मातून आशीर्वाद देत आहेत’, असे दिसणे

नंतर मला सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांचे दर्शन झाले. ते कुंभमेळ्‍याच्‍या ठिकाणी होते. ‘कुंभमेळ्‍याच्‍या ठिकाणी सूक्ष्मातून अनेक सिद्ध, योगी आणि महात्‍मे साधनेसाठी आले आहेत अन् त्‍यांपैकी ५ दिव्‍यात्‍मे सद़्‍गुरु डॉ. पिंगळेकाकांना सूक्ष्मातून आशीर्वाद देत आहेत’, असे मला दिसले.

‘आम्‍ही नेहमीच सद़्‍गुरु डॉ. पिंगळेकाकांच्‍या समवेत असणार’, असे त्‍यांनी सांगितले.

७. सनातन संस्‍थेचे प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस आणि त्‍यांच्‍या दोन्‍ही बाजूंना त्‍यांचे संरक्षण करणार्‍या दोन देवता दिसणे

त्‍यानंतर मला सनातन संस्‍थेचे प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस दिसले. त्‍यांच्‍या दोन्‍ही बाजूंना त्‍यांचे संरक्षण करणार्‍या दोन देवता दिसल्‍या. ‘त्‍या देवता श्री. चेतन यांना धर्म कार्यासाठी शक्‍ती देत असून त्‍यांचे रक्षणही करत आहेत’, असे दिसले.

८. स्‍वतःचे रूपांतर प्रकाशात होणे, श्‍वेत कामधेनु दिसणे आणि तिने गोलोकात नेणे

त्‍यानंतर माझे रूपांतर प्रकाशात झाले. तो प्रकाश वर-वर जाऊ लागला. पुढे तो बारीक रेषेप्रमाणे होत गेला. त्‍यानंतर मला श्‍वेत कामधेनु दिसली. तिने विविध अलंकार धारण केले होते. ती मला घेऊन गोलोकात गेली. तेथे सर्व गायींनी सुंदर अलंकार धारण केले होते. प.पू. देवबाबांच्‍या आश्रमात बाबाजी मंचाजवळ असलेल्‍या चित्रातील गायीप्रमाणे सर्वांचे अलंकार होते. तेथे कपिला गायींचा कळप होता. तेथे नेल्‍यावर कामधेनूने मला ‘तुझ्‍या इच्‍छा व्‍यक्‍त कर. त्‍या पूर्ण होतील’, असे सांगितले. तेव्‍हा माझ्‍याकडून प्रार्थना झाली, ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्‍य लाभू दे. हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना लवकरात लवकर होऊ दे. सनातनच्‍या सर्व संतांना होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्मिक त्रास नष्‍ट होऊ दे. हिंदुत्‍वाचे कार्य करणारे सर्व साधक आणि हितचिंतक यांचे त्रास नष्‍ट होऊ देत.’ ‘एकूण ५ प्रार्थना कर’, असे कामधेनूने सांगितल्‍यावर ‘आम्‍हा सर्व साधकांची साधना होऊ दे’, अशी प्रार्थना माझ्‍याकडून झाली.

९. हिमालयवासी योगी दिसणे आणि त्‍यांनी साधिकेला आशीर्वाद देणे

नंतर काही वेळाने मला एक योगी दिसले. ते हिमालयवासी असून सूक्ष्मातून ते त्‍या लोकात होते. त्‍यांनी एक क्षण डोळे मिटले आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची साधिका म्‍हणून मला आशीर्वाद दिले.’

– होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०१९)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक