पुणे साखळी बाँबस्फोट प्रकरण
पुणे – येथील जंगली महाराज रस्ता येथे वर्ष २०१२ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणातील असलम शेख उपाख्य बंटी जहागीरदार या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन संमत करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा नोंद असलेल्या सहआरोपींना त्याने बंदूक विकल्याचा आरोप आहे. पुणे साखळी बाँबस्फोट प्रकरणी त्याला प्रथम वर्ष २०१३ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला १ ऑक्टोबर २०१५ या दिवशी पहिल्यांदा जामीन संमत झाला; परंतु २०१९ मध्ये त्याने जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या (ए.टी.एस्.) विनंतीवरून त्याचा जामीन उच्च न्यायालयाने रहित केला. त्यानंतर जहागीरदारने वर्ष २०२० मध्ये पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्याला आता जामीन संमत झाला आहे.
वर्ष २०१२ च्या प्रकरणात अद्याप खटला चालूच झालेला नाही आणि आरोपीने यापूर्वीच ६ वर्षांचा कारावास भोगला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आरोपीला अधिक काळ गजाआड ठेवणे आवश्यक नाही, अशी टिप्पणी करून न्या. अजय गडकरी यांनी अस्लमला पूर्वीच्याच आदेशातील अटी आणि शर्तींप्रमाणे जामीन संमत केला आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या आतंकवाद्यांनी १ ऑगस्ट २०१२ या दिवशी जंगली महाराज रस्त्यावर ५ बाँबस्फोट घडवून आणले होते. या बाँबस्फोटातील आरोपी इरफान लांडगे याला बंटीने हत्यार पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने या साखळी बाँबस्फोटप्रकरणी मुनीब इक्बाल मेमन, असद खान, इम्रान खा फिरोज, इरफान लांडगे, फारुख बागवान, काशिफ बियाबानी आणि असलम शेख अशा ८ जणांना अटक केली होती. (या सर्व धर्मांध आरोपींची नावे ऐकल्यानंतर ‘आतंकवादाला धर्म असतो’, हेच सिद्ध होेते. – संपादक)
संपादकीय भूमिकाबाँबस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळणे, हे जनतेच्या जीवाशी खेळण्यासारखे नव्हे का ? |